Eid-e-Milad un Nabi 2019: इस्लाम धर्मीयांसाठी (Islam) महत्वाचा असा रबी उल अव्वल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबी(Eid-e-Milad Un Nabi) च्या रूपात साजरा केला जातो. यंदा 10 नोव्हेंबर रोजी हा सोहळा असून त्यानिमित्ताने आतापासूनच देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यादिवशी पैगंबरांच्या शिकवणीची उजळणी केली जाते तसेच नमाज पठण करून त्यांना अभिवादन केले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी जुलूस काढण्याची सुद्धा पद्धत आहे. यंदा या दिवशी तुमच्या ओळखीतील मुस्लिम बांधवाना काही खास शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. याकरिता ही काही मराठमोळी शुभेच्छापत्र Greetings, SMS, GIFs, Images, WhatsApp Status आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी कामी येतील.
अलीकडे सोशल मीडियाच्या जगात ऑनलाईन शुभेच्छांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे या शुभेच्छा देताना तुमच्या भावना आणि सदिच्छा समोरच्या पर्यंत पोहचवणे आवश्यक असते. आता तुमचे विचार दर्शवण्यासाठी स्वतःच्या भाषेशिवाय उत्तम पर्याय कोणता? म्हणूनच ईद निमित्त आम्ही काही मराठी संदेश तयार केले आहेत. चला तर मग पाहुयात..
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईद ची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...
ईद मुबारक!
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या खूप खूप शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा
GIF
ईद- मिलाद च्या या पवित्र दिवशी तुम्ही या ग्रीटिंग्सच्या रूपात प्रियजनांना शुभेच्छा द्याच मात्र त्यासोबतच आपले कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यासोबत मिळून हा उत्सव उत्साहात साजरा केल्यास खऱ्या अर्थाने सणाला चार चांद लागतील यात शंका नाही.