Eid-e-Milad un Nabi 2024 Mubarak Messages: इस्लाम धर्मात, ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid-e-Milad un Nabi 2024) हा सण रबिउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला मिलादुन्नबीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्म झाला. प्रेषित मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे झाला होता. ईद-ए-मिलाद-उन-नबी दरवर्षी प्रेषित मोहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
दरवर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने घर आणि मशीद सजवली जाते. हा मुस्लिम बांधवांचा उत्सवाचा दिवस आहे. या लोक दर्ग्यात जाऊन हजरत मोहम्मद यांचे संदेश वाचतात. या दिवशी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून अल्लाहची उपासना करण्यात दिवस घालवला जातो. ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त ईद-ए-मिलाद अन नबी ग्रीटिंग्ज, ईद-ए-मिलाद अन नबी एसएमएस, ईद-ए-मिलाद अन नबी प्रतिमा, ईद-ए-मिलाद अन नबी व्हॉट्सॲप स्टेटस शेअर करून तुम्ही मुस्लिम बांधवांना या खास दिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता.
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा!
-----------
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस!!
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
अल्लाह तुमच्या सर्व सर्व इच्छा पूर्ण करो,
तुमच्या घरात आनंद, सुख, समृद्धी नांदो
हीच आमची सदिच्छा
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
सजली मस्जिद, सजली घरे
लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह चौहीकडे
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
हजरत मोहम्मद यांनी अल्लाहला वचन दिले होते की, ते इस्लाम धर्माचे नेतृत्व करतील. लोकांना इस्लाम समजावून सांगताना मोहम्मद साहेबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी शत्रूंचा जुलूम आणि छळही सहन केला.