Dr BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: 63 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त चैत्यभूमी, संसद भवन परिसरात दिग्गजांचे डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांना अभिवादन! (Photos)
महापरिनिर्वाण दिन । Photo Credits: Twitter @PIBIndia

Dr BR Ambedkar 63rd Mahaparinirvan Din: आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवसाचं औचित्य साधून देशभरातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुंबईतील चैत्यभूमीवर आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान दिल्लीमध्ये संसद भवन परिसरातदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण केले आहेत. पहा दिल्लीपासून मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोणकोणत्या राजकारण्यांनी महामानवाला अर्पण केली आदरांजली? Ambedkar Mahaparinirvan Din 2019 Messages: 63व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे मराठी मेसेजेस आणि WhatsApp Status

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली मान्यवरांनी आदरांजली

 

छगन भुजबळ। Photo Credits: Twitter
Ramdas Aathavale | Photo Credits: Twitter
CM Uddhav Thackeray | Photo Credits: Twitter
Narendra Modi | Photo Credits: Twitter

चंद्रकात पाटील

अजित पवार  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 साली नवी दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरी झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा स्मृतिदिन 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून ओळखला जातो. यंदा बाबासाहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन असून बौद्ध धर्मांची शिकवण देत भारतामध्ये सामाजिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.