Gift Ideas (Photo Credits: PixaBay)

दीपावली मधील दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा एक महत्त्वाचा दिवस आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. रोषणाईच्या, आतषबाजीच्या या सणामध्ये एकमेकांना भेटून गिफ्ट्स देण्याची परंपरा आहे. त्यामध्ये तुम्ही नव विवाहित जोडपं असेल तर पाडवा थोडा खास असतो. यंदा दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या साथीदाराला अजून गिफ्ट (Gift) घेतलं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आज संध्याकाळी पत्नी कडून पतीचं औक्षण केल्यानंतर तिला खूष करण्यासाठी आणि पतीलाही रिटर्न गिफ्ट देत सरप्राईज देण्यासाठी ही काही गिफ्ट्स तुम्हांला आज अगदी शेवटच्या क्षणी विकत घेता येणार आहेत.

दिवाळी हा सण आनंदाचा, चैतन्याचा आहे. दिवाळीच्या दिवसात खाण्या-पिण्याच्या पदार्थांची जशी चंगळ असते तशीच गिफ्ट्सची देखील लयलूट असते. मग तुमच्या साथीदाराचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या काही गिफ्ट्स आयडियाज नक्कीच मदत करू शकतील. नक्की वाचा: Diwali Padwa 2021 Wishes: दिवाळी पाडव्या निमित्त मराठमोठे संदेश, WhatsApp Status, Wallpapers, Facebook Post, Images मित्रपरिवाराला पाठवत द्या शुभेच्छा!

दिवाळी पाडवा गिफ्ट आयडियाज

सोनं

सोनं आणि दिवाळी हे जणू समीकरण आहे. दिवाळी पाडवा हा शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी हमखास ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी असते. मग स्त्री असो किंवा पुरूष सोन्याच्या दागिन्यांमध्ये येणारे नवे ट्रेंड्स आपल्याकडेही असावेत यासाठी अनेकजण उत्सुक असतात. सध्या सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्स कडूनच नवनवे पर्याय उप्लब्ध असतात. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही सोन्याचे दागिने आज खरेदी करू शकता.

टूर पॅकेज

दीड-दोन वर्ष लॉकडाऊन आणि क्वारंटीन च्या चक्रात अडकलेल्या अनेकांना आता त्यामधून थोडा ब्रेक हवा आहे. मग आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत या सुट्टीच्या काळात एखादी टूर प्लॅन करू शकता. यासाठी काही टूर कंपनींसोबत किंवा वैयक्तिक देखील काही टूर पॅकेज बूक करून साथीदाराला सरप्राईज देऊ शकता.

गॅझेट्स

दिवाळी मध्ये सोन्या सोबतच आजच्या तरूणाईला क्रेझ असते ती म्हणजे नव्या गॅझेट्सची. नवं तंत्रज्ञान आणि त्याच्या सोबतीने आपलं जीवनमान गतिमान करण्यासाठी अनेक गॅझेट्स बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये स्मार्टवॉच पासून अगदी इअर बर्ड्स, स्मार्ट फोन्सचा समावेश आहे. दिवाळी निमित्त अनेक ई कॉमर्स वेबसाईट्स वर धमाकेदार ऑफर्स देखील सुरू आहेत. तेथे किंवा इन स्टोअर देखील तुम्ही खरेदी करू शकता.

स्पा/रिलॅक्ससेशन व्हाऊचर्स

मागील दीड-दोन वर्षांचा काळ हा प्रत्येकासाठीच तणावपूर्ण होता. आता आपण यामधून बाहेर पडत असल्याने सुरक्षित वातावरणामध्ये न्यू नॉर्मल स्वीकरण्यासाठी सज्ज होण्यापूर्वी तुमच्या साथीदाराला थोडं रिलॅक्स होणं गरजेचं आहे. त्यासाठी ब्युटिपार्लर पासून रिलॅक्सेशन सेंटर्स पर्यंत अनेक ठिकाणी ताण हलका करण्याकरिता अनेक पॅकेजेस असतात त्यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते.

वसूबारस, धनतेरस, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस दीपावलीचा सण वर्षभराचा आनंंद घेऊन येतो. मग तुमच्या आयुष्यातील प्रियजणांचा हा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास गिफ्ट्स सोबतीला असणं आवश्यक आहे.