
Diwali Padwa 2021 Wishes: बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा चौथा दिवस पाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे हा दिवस. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून करावी. आश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही बलिप्रतिपदा दीपावली पाडवा म्हणून 5 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.(Ayodhya Deepotsav 2021: अयोध्यामध्ये पार पडला दीपोत्सवाचा कार्यक्रम; तब्बल 12 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी, झाला विश्वविक्रम Photo & Videos)
सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापार्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या बलिप्रतिपदा दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीचे चित्र काढून पूजा केली जाते. इडा, दु:खापासून मुक्ती आणि पीडितांचे राज्य, ही प्रार्थना या दिवशी केली जाते. तसेच दिव्यांचा उत्सव देखील केला जातो.तर दिवाळी पाडव्या निमित्त मराठमोठे संदेश, WhatsApp Status, Wallpapers, Facebook Post, Images मित्रपरिवाराला पाठवत द्या शुभेच्छा! (Diwali 2021 Simple Rangoli Designs: दिवाळी निमित्त दारात रांगोळी काढण्यासाठी फुलांची, ठिपक्यांची ते संस्कार भारती पद्धतीतील या पहा सहज सोप्या डिझाईन्स Watch Video)





आपल्या कृषी संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व प्राप्त झालेले आपले सर्व सण प्रामुख्याने याच निसर्गावर आधारित आहेत. पौराणिक महत्त्व आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणार्या कार्तिक महिन्याची सुरुवात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पूर्व-व्यापार ही नवीन सुरुवात मानली जाते