हिंदू धर्मीयांसाठी दिवाळीचे 4-5 दिवस म्हणजे आनंदाला उधाण असते. ग्रामीण भागात वसूबारस (Vasubaras) पासून दिवाळी सुरू होते तर शहरात धनतेरस (Dhanteras) किंवा धनत्रयोदशी (Dhantrayodashi) पासून दिवाळीची धामधूम सुरू होते. यंदा धनतेरस 22 ऑक्टोबर दिवशी आहे. या दिवशी धन्वंतरी पूजन देखील करण्याची प्रथा आहे. आयुर्वेदाची देवता म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते. यासोबतच अनेक जण धनत्रयोदशी दिवशी कुबेराची पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्तूंची देखील खरेदी करतात. यंदा तुम्ही देखील धनतेरस किंवा धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर पहा सोनं खरेदीचा या दिवशी कोणत्या वेळा या शुभ मुहूर्त आहेत?
धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदीच्या शुभ वेळा कोणत्या?
धनत्रयोदशी यंदा 22 ऑक्टोबरला साजरी केली जाणार असल्याने शनिवारी संध्याकाळी मुहूर्ताच्या वेळेस सोनं खरेदी करायचं असल्यास 6 वाजून 11 मिनिटं ते 7 वाजून 44 मिनिटं या वेळेत खरेदी केलं जाऊ शकतं. रात्रीच्या वेळेमध्ये 9.17 ते 1.56 या वेळेत ही खरेदी केली जाऊ शकते. सकाळच्या वेळेत सोनं खरेदी साठी 5.02 ते 6.35 चा मुहूर्त आहे. दुपारच्या वेळेस 1 वाजून 50 मिनिटं ते 3 वाजून 16 मिनिटं या काळातही सोनं खरेदी करण्याची चांगली वेळ आहे. हे देखील नक्की वाचा: Gold Silver Rate: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदिच्या किमतीत मोठी घसरण, गुंतवणुकीसह मिळवा मोठा फायदा.
सोनं खरेदी हा धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. दिव्यांच्या सणासोबतच शुभ संकेतांचाही हा सण असल्याने आपल्यावर लक्ष्मीचा, कुबेराचा वरदहस्त कायम रहावा म्हणून प्रार्थना देखील केली जाते. त्यासाठीच सोनं, चांदी किंवा तांबं, पितळ्याची वस्तू खरेदी केली जाते.
टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.