Gold | Photo Credits: Pixabay.com)

गेले काही दिवस सोने चांदीचे (Gold Silver Rate) भाव अगदी गगनाला भिडले होते. पण आता सोन्याचे भाव (Gold Price) मात्र काहीसे वधरल्याचं चित्र आहे. तरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हो आता सोन खरेदी करणं अधीक फायद्याचं ठरेल. पण आता दसऱ्याच्या मुहुर्तावर देशभरातील नागरीकांनी मोठी सोन्याची खरेदी केली आहे. तर आता अगदी काही दिवसांच्या अंतरावर दिवाळी (Diwali) येवून ठेपली असताना सराफा बाजारात (Sarafa Market) मोठी गर्दी बघायला मिळत आहे. कारण गेले काही दिवसात सोन्याचे भाव कमालीचे कमी झाले आहेत. तरी तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचा विचार करत असाल ते सध्या अधिक फायद्याचे ठरणार आहे कारण सोन्याची किंमत सध्या विक्रमी निचांकावर आली आहे असं म्हणायला हरकत नाही

MCX वर सोने १.३% किंवा सुमारे रु. ७०० प्रति १० ग्रॅमने घसरून ५१,३२९ पर्यंत कमी झाली, जी सुमारे 3 महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. तसेच MCX वर चांदी रु. १,५०० किंवा २.५% घसरून रु. ५९,३४० प्रति किलो झाली. . तरी पुढील काही दिवसांत सोने चांदिचे भाव आणखीचं कमी होण्याचे संकेत आहे. धनोत्रयादशीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वधरण्याचे संकेत आहेत. (हे ही वाचा:- Rupee vs Dollar: रुपयाची विक्रमी घसरण; अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गाठली 82.68 नीचांकी पातळी)

 

पण तसेच अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत जर रुपया आणकीच घसरला तर भारतात सोने महाग होण्याची मोठी शक्याता वर्तवण्यात येत आहे. तरी तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आज शुभ मुहूर्तासह पुढील सोने किमतीचा वेध घेता आज सोने खरेदी करणं अधिक फायद्याचं ठरेल.