Representational Image (Photo Credits: File Image)

Rupee vs Dollar: भारतीय चलन रुपया आज सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला आहे. सुरुवातीच्या व्यापारात, तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 82.68 प्रति डॉलरवर आला आहे. रुपयाच्या विक्रमी घसरणीनंतर प्रचंड चिंतेचे वातावरण असून तो प्रति डॉलर 85 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने सर्वकालीन नीचांक गाठला आहे. एका डॉलरची किंमत प्रथमच 82.68 रुपये झाली आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नाही आणि रुपया स्थिर कमजोरीसह व्यवहार करत आहे.

यंदा रुपया 11 टक्क्यांनी घसरला -

या वर्षी रुपयाच्या घसरणीवर नजर टाकली तर तो 11 टक्क्यांनी खाली आला आहे. भारताचा परकीय चलनाचा साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्यानंतर डॉलरची मागणी वाढत असून रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. (हेही वाचा - Diwali Bonus For Railway Employees: खुशखबर! केंद्र सरकारचे रेल्वे कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; दिवाळी बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा वाढीव पगार)

आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आज शेअर बाजारात जबरदस्त घसरणीसह व्यवहार सुरू झाला आहे. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 220.30 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी घसरून 17,094.35 वर उघडला. BSE सेन्सेक्स 767.22 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्यांनी घसरून 57,424.07 वर उघडला आहे.

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचा नकारात्मक परिणाम रुपयावर होत असून या बाजारातून डॉलरची खरेदी वाढल्याने देशाचे चलन रुपया लाल चिन्हात घसरत आहे. याशिवाय, इतर आशियाई चलनांच्या घसरणीमुळे आशियाई बाजारांचा कल दिसून येत आहे, ज्यामुळे त्यांच्यासह भारतीय चलन रुपयाचीही घसरण होत आहे.