Diwali Bonus For Railway Employees: खुशखबर! केंद्र सरकारचे रेल्वे कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; दिवाळी बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा वाढीव पगार
दिवाळी बोनस Photo Credits: IANS)

Diwali Bonus For Railway Employees: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Government) शनिवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employees) 78 दिवसांच्या पगाराइतका दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर केला. दसऱ्याच्या सुटीपूर्वी हा बोनस कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. मात्र, आरपीएफ आणि आरपीएसएफच्या जवानांना हा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळातही रेल्वे कर्मचाऱ्यांनी अन्न, खत, कोळसा आणि इतर वस्तूंची अखंडित वाहतूक केली. गेल्या तीन वर्षांत मालवाहतुकीत बाजारपेठेतील वाटा मिळवण्यासाठी आणि योग्य धोरणात्मक उपक्रमांद्वारे प्रवासी भाडे वसूल करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. परिणामी, महामारीमुळे विस्कळीत झालेल्या चालू आर्थिक वर्षात (2022-23) रेल्वेने आपली आर्थिक गती पुन्हा मिळवली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात रेल्वेने 184 दशलक्ष टन मालवाहतूक केली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. (हेही वाचा - Bank Rules Change From Oct: 1 ऑक्टोबरपासून बदलले 'हे' सरकारी नियम; याचा तुमच्यावर काय परिणाम होणार, जाणून घ्या)

बोनसचे पेमेंट प्रोत्साहन म्हणून काम करेल. यामुळे मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचार्‍यांना, विशेषत: जे लोक रेल्वेचे कार्यप्रदर्शन आणि ऑपरेशनमध्ये गुंतलेले आहेत, त्यांची उत्पादकता सुधारण्यास मदत करेल. बोनसच्या पेमेंटमुळे येत्या सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्थेत मागणी वाढेल. (हेही वाचा - Small Saving Schemes: खूशखबर! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ)

रेल्वे कर्मचार्‍यांना 78 दिवसांच्या बोनससाठी 1,832.09 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. बोनस भरण्यासाठी विहित वेतन गणना मर्यादा रु 7,000 प्रति महिना आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी जास्तीत जास्त 17,951 रुपये दिले जातील.