Datta Jayanti Marathi Messages: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रांवर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला आणि तेव्हापासून दत्ताचा हा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. अशा असूर शक्तींचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार, वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात अशी कथा आहे. असे म्हणतात की दत्त जयंती ला दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
यंदाही हा दत्त जयंती चा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाईल. 'दिगंबरा दिगंबरा' च्या जयघोषाने दाही दिशा दुमदुमून जातील. अशा या मंगलदिनी दत्त गुरूंच्या प्रिय भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस:
धावत येसी भक्तांसाठी, ब्रह्मा, विष्णू, महेश्वरा
दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आता नको ही दिव्य दृष्टी
आता नको ही जड सृष्टी
फक्त असावी आपल्यावर
आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी
दत्त जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
हेदेखील वाचा- Datta Jayanti 2019: दत्त जयंती यंदा 11डिसेंबर दिवशी; जाणून घ्या दत्तात्रेय जयंतीचं महत्त्व, पूजा वेळ काय?
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो
सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
ज्याच्या मनी गुरुविचार तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरुभक्ती त्याला नाही कशाची भीती
दत्त जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
पाहा व्हिडिओ
दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.