Dandi March (Photo Credits: Wikimedia Commons)

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी 1930 साली गुजरातमधील साबरमती आश्रमातून काढलेल्या दांडी यात्रेला आज 89 वर्ष पूर्ण होत आहेत. मीठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रा या घटना भारतीय स्वातंत्र्यपूर्ण काळातील महत्त्वाच्या घटना आहेत. दांडी यात्रेची सुरुवात 80 लोकांपासून झाली. त्यानंतर या 390 किलोमीटरच्या प्रवासात तब्बल 50 हजार लोक सहभागी झाले.

या खास दिवसाच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) राष्ट्रीय पिता महात्मा गांधी यांना वंदन केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, "बापू आणि त्यांच्या सोबतीने न्याय-समानतेसाठी दांडी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना माझ्याकडून वंदन." असं म्हणत मोदींनी काही दांडी यात्रेनिमित्त काही विचार शेअर केले आहेत.

त्याचबरोबर काँग्रेसने दांडी यात्रेच्या 89 व्या वर्षपूर्तीनिमित्त खास ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, "महत्मा गांधींनीच्या अधिपत्याखाली निघालेल्या दांडी यात्रेला आज 89 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्रिटीश राजवटीला अहिंसतेने केलेला विरोध म्हणजे मीठाचा सत्याग्रह." आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेस कमिटीची गुजरातमध्ये बैठक पार पडणार आहे.

12 मार्च 1930 साली निघालेली दांडी यात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम ते गुजरातमधील दांडी या गावापर्यंत चालला. मीठावरील कर रद्द करण्यासाठी ब्रिटीश सरकार विरुद्ध उचललेले हे अहिंसेचे पाऊल होते. 24 दिवसांची ही दांडी यात्रा 6 एप्रिल 1930 रोजी समाप्त झाली.