Children's Day wishes (File Image)

14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस (Pandit Jawaharlal Nehru Birth Anniversary) असतो. हा दिवस हा बालदिन (Children's Day 2021) म्हणून साजरा केला जातो. नेहरू यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत असत, म्हणूनच नेहरूंच्या जन्मदिनादिवशी बालदिन साजरा होतो. बालदिन हा लहान मुलांना समर्पित भारताचा राष्ट्रीय सण आहे. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते.

जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन उर्फ चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. 1959 मध्ये ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद (डिक्लरेशन ऑफ चिल्ड्रन्स राइट्स) स्वीकारली. इकडे भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मुले त्यांच्या शाळांमधील कार्यक्रमात सहभागी होत असत आणि पंडित जवाहरलाल नेहरूदेखील त्यांचा वाढदिवस लहान मुलांसोबतच साजरा करत असत. त्यामुळे नेहरूंच्या मृत्युनंतर त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा होण्यास सुरुवात झाली.

तर अशा या दिवसाचे औचित्य साधून बालदिनाच्या निमित्ताने तुम्ही खास मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers, Wishes, HD Images च्या माध्यमातून तुमच्या मित्रांना, त्यांच्या मुलांना, तुमच्या ओळखीतील लहानग्यांना तसेच सोशल मीडियावरील परिवाराला शुभेच्छा देऊ शकता.

Children's Day wishes
Children's Day wishes
Children's Day wishes
Children's Day wishes
Children's Day wishes

दरम्यान, प्रत्येक लहान मुलाला आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा, आपले लहानपण एन्जॉय करण्याचा हक्क आहे. हीच लहान पिढी देशाचे भावी सुशिक्षित, आरोग्यसंपन्न आणि उज्वल असे भविष्य आहे. त्यामुळे हा दिवस साजरा करुन लहान मुलांविषयी वाटणारे प्रेम आणि आदर नक्की व्यक्त करा, सोबतच लहान मुलांचे कोडकौतुक करण्यासही विसरू नका. सर्व बच्चेकंपनीला लेटेस्टली मराठी कडून बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा