
Sambhaji Maharaj Jayanti 2022 Images: संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी हे त्यांचे वडील शिवाजी यांच्यासारखे शूर आणि प्रतिभावान व्यक्ती होते. वडील शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. मुघलांनी त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले केले, पण ते त्यांना पराभूत करू शकले नाहीत. महाराज नेहमीच मुघलांच्या विरोधात होते. त्यांचा जीवन परिचय पराक्रम आणि त्यागाने भरलेला आहे.
संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर (पुणे) झाला. त्यांचे वडील शिवाजी राजे भोसले हे मराठा वीर योद्धे होते. ज्यांना स्वराज्य स्थापन करायचे होते. संभाजींच्या आईचे नाव सईबाई होते. त्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. शंभूराजे हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. आज सर्वत्र संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त SMS, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून शंभूराजांना अभिवाद करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि याद्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना संभाजी महाराज जयंतीच्या खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Sambhaji Maharaj Jayanti 2022 Messages: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Wallpaper, Images शेअर करत द्या खास शुभेच्छा)







संभाजी फक्त 2 वर्षांचे असताना त्यांची आई सईबाई यांचा मृत्यू झाला. बाल संभाजी यांचे संगोपन त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. असे म्हणतात की संभाजी 9 वर्षांचे असताना त्यांना मिर्झा राजा जयसिंग सोबत पुरंदरच्या तहासाठी मुघल दरबारात पाठवण्यात आले होते. संभाजी महाराजांचा विवाह जीवूबाई यांच्याशी झाला. त्यांनी लग्नानंतर तिचे नाव बदलून येसूबाई ठेवले.