Sambhaji Maharaj Jayanti 2022 Messages: मराठा साम्राज्याचे दुसरे शासक संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील अन्य भागात छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी भोसले यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कार्यभार स्वीकारला आणि मराठा साम्राज्याचे दुसरे शासक बनले. संभाजी भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला होता.छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 2 ऱ्या वर्षी आई सईबाईला गमावले होते. आजी जीजाबाई यांनीच संभाजी राजेंचे पालपोषण केले. संभाजी महाराज यांनी 1672 मध्ये पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत कोलवान येथे विजय अभियानात पहिल्यांदाच मराठा सेनेचे नेतृत्व केले होते. प्रत्येक वर्षी 14 मे रोजी संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा शासनकाळातील त्यांचे योगदान श्रद्धांजलिच्या रुपात साजरी केली जाते. संभाजी यांना सिंहासनावर बसण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांनी 9 वर्ष शासन केले. संभाजी महाराज मराठा धर्माचे रक्षक होते. आपल्या निडरतेसाठी ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Wallpaper, Images शेअर करत द्या मराठमोळ्या शुभेच्छा!
>>शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन!
>>पाहुनी शौर्य तुजपुढे
मृत्यूही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी
माझा शंभू अमर झाला
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
>मृत्यूला मारण्याचा होता कावा
हे धाडस बाळणारा फक्त तोच एक छावा
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा!
>>श्रृंगार होता संस्काराचा
अंगार होता स्वराज्याचा
शत्रुही नतमस्तक होई जिथे
असा पुत्र माझ्या शिवबाचा
छत्रती संभाजी महाराच जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
>>धर्मशास्रपंडित
ज्ञानकोविंद
सर्जा
रणधुरंदर
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनधिश्वर
छत्रपची संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
संभाजी महाराज हे स्वतः शुर योद्धा आणि उत्तम राजा होते. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांनी 150 पेक्षा अधिक युद्ध लढले असून त्यापैकी एकामध्ये देखील त्यांना शरणागती पत्करावी लागली नाही. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.