महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) साजरी केली जात आहे. आषाढ शुक्ल एकादशीला विठू माऊलीचं दर्शन घेऊन चातुर्मासाची (Chaturmas) सुरूवात केली जाते. हिंदू धर्मीयांसाठी हा चातुर्मासाचा काळ देखील महत्त्वाचा असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. पुराणातील कथेनुसार, आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात. यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला म्हणजे देवउठनी एकादशीला देव निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात.
दरम्यान चातुर्मासाच्या काळात शुभ कार्य, मंगल कार्य निषिद्ध असतात. अनेक घरांमध्ये या काळात मांसाहार, कांदा-लसूण यांचा नियमित आहारात समावेश केला जात नाही. लग्ना सारखी कार्य देखील टाळली जातात. नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2021 Wishes: आषाढी एकादशी मराठी शुभेच्छा, Quotes, Messages Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत विठ्ठल भक्तांचा दिवस करा मंगलमय.
चातुर्मास 2021 ची सुरूवात - 20जुलै 2021
चातुर्मास 2021 ची सांगता - 14 नोव्हेंबर 2021
महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशी दिवशी विठू माऊलीचे भक्त दिवसभर उपवास करतात. यामध्ये केवळ फलाहार आणि दूध पिऊन दिवसभर विठूमाऊलीसाठी व्रत करण्याची प्रथा आहे. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी आषाढी एकादशीचं व्रत करण्याची प्रथा असल्याचं सांगितलं जातं.
टीप: वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. त्यामधील कोणत्याही गोष्टीची आम्ही पुष्टी करत नाही.