
Ashadi Ekadashi Wishes in Marathi: आषाढ शुक्ल एकादशीचा दिवस म्हणजे देवशयनी एकादशी. यंदा हा सोहळा 20 जुलै दिवशी महाराष्ट्रात रंगणार आहे. विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला या दिवशी वारकरी मंडळी पायी वारी करत देशाच्या काना-कोपर्यातून पंढरपुरात दाखल होतात पण यंदा देखील कोरोना संकटामुळे आषाढी एकादशीचं स्वरूप बदललं आहे. पायी वारी न करता यंदा मोजकेच वारकरी बस ने पंढरपुरात दाखल झाले आहेत तर राज्यातील विठूमाऊलीची मंदिरं देखील भाविकांशिवाय आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) साजरी करणार आहेत. पण या आषाढीला विठ्ठल- रूक्मिणीचे भक्त आणि देवामध्ये असा दुरावा असला तरीही मनाने सारे विठू माऊलीचा गजर करत पंढरीतच असणार आहेत मग हे अंतर यंदा देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून भरू काढता येऊ शकतं. विठू माऊलीच्या भक्तांना यंदा देवशयनीच्या शुभेच्छा आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस, Wishes, Quotes, HD Images, Greetings, संतवाणी ही Facebook, Twitter, Instagram,WhatsApp Status द्वारा शेअर करून द्विगुणित करूया.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठू माऊलीचे भक्त विठू नामाचा गजर करतात. दिवसभर उपवास करतात. आषाढ शुक्ल एकादशी पासूनच महाराष्ट्रात अनेक वारकरी मंडळी चातुर्मासाची सुरूवात म्हणून पुढील चार महिने कांदा- लसूण यांचा आहारातून त्याग करतात. कार्तिकी एकादशी पर्यंत हे व्रत पाळले जाते. यंदा देखील वारी चुकल्याचं शल्य अनेक वारकर्यांच्या मनात आहे. पण कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कराव्या लागलेल्या या तडजोडीमधून नव्या पद्धतीने साजर्या होणार्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना देऊन हा सण साजरा करा. Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशी निमित्त मराठी मेसेज, Quotes, WhatsApp Status, Wishes, HD Photos पाठवून साजरा करा विठुरायाचा गजर.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल माझा ध्यास
विठ्ठल माझा श्वास
विठ्ठल माझा भास
विठ्ठल माझा आभास
सार्या विठू भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

चंद्र भागेच्या तीरी
उभा मंदिरी
तो पहा विटेवरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

सर्व विठू माऊलींच्या भक्तांना देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

रंगी रंगला श्रीरंग ।
मी- तू पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया ॥
विठ्ठल-रूक्मिणीच्या भक्तांना
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारी व्हॉट्सअॅप स्टिकर्स
व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर देखील विविध सणांनुसार, आता व्हॉट्सअॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. यंदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही ही स्टिकर्स गूगल प्ले स्टोअर्सच्या माध्यमातून शेअर करू शकता.