Chaitra Navratri | File Image

चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना आहे. चैत्रमासारंभासोबतच हिंदू धर्मीय चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चैत्र नवरात्र (Chaitra Navratri) देखील साजरी करण्यास सुरूवात करतात. चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमी असे नऊ दिवस चैत्र नवरात्र साजरी करण्याची रीत आहे. यंदा ही चैत्र नवरात्र 30 मार्च ते 6 एप्रिल साजरी केली जाणार आहे. मग अशा या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांसोबत साजरा करण्यासाठी सोशल मीडीयात त्यांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा पाठवून आनंद द्विगुणित करू शकता. चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Status, Facebook Messages, Quotes, Wishes शेअर करून देखील साजरा करू शकता.

चैत्र नवरात्री मध्येही अनेक ठिकाणी घराघरात घटस्थापना केली जाते. मंगलमय वातावरणामध्ये नव हिंदुवर्षाचं स्वागत केले जातं. तर शारदीय नवरात्री प्रमाणे दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना करण्याची पद्धत आहे. नक्की वाचा: Chaitra Navratri 2025 Dates: यंदा चैत्र नवरात्र 30 मार्च ते 6 एप्रिल; जाणून घ्या घटस्थापना कधी कराल? 

चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

Chaitra Navratri | File Image
Chaitra Navratri | File Image
Chaitra Navratri | File Image
Chaitra Navratri | File Image
Chaitra Navratri | File Image

नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर केला जातो. महाराष्ट्रात चैत्र नवरात्री निमित्त अनेक घरांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या आलेल्या महिलांना हळदी कुंकू दिले जाते. या दिवसात उष्णतेचा वाढता पारा पाहता कैरीचं पन्ह अणि आंबेडाळ दिली जाते. महाराष्ट्रात या काळात चैत्रगौर देखील साजरा केला जातो. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीय या महिन्याभराच्या काळासाठी साजरा केला जातो.