Chand Raat Mubarak | File Image

भारतामध्ये काही भागांमध्ये आज रमजान ईद साजरी होत आहे तर बहुतांश भागांत उदया म्हणजे 14 मे दिवशी यंदाची रमजान ईद किंवा ईद-उल-फितर (Eid ul-Fitr)साजरी होणार आहे. अनेकांकडून सध्या त्यांच्या प्रियजनांना चांद रात मुबारक (Chaand Raat) म्हणत रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यास सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान Eid ul-Fitr ची पूर्वसंध्या ही चांद रात म्हणून ओळखली जाते आणि आजची रात्र ही महाराष्ट्रासह अनेक भागात साजरी होणार असल्याने तुमच्या प्रियजनांना, मुस्लिम मित्र मंडळींना ही चांद रात मुबारक म्हणण्यासाठी तुम्ही खास शायरी, मेसेजेस, Wishes, HD Images, GIfs शोधत असाल तर आज तुम्ही योग्य पेज वर आला आहेत. आम्ही टीम लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही चांद रात मुबारकची खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messages, Instagram Stories द्वारा शेअर करून गोड शुभेच्छा देऊ शकता. (नक्की वाचा: Chand Raat 2021 Mubarak Messages: चांद रात मुबारक Greetings, Quotes शेअर करत Facebook, WhatsApp Status द्वारा प्रियजनांना द्या शुभेच्छा! ).

दरम्यान रमजान हा ईस्लामिक कॅलेंडरचा पवित्र महिना आज संपून उद्यापासून दहावा शव्वाल महिना सुरू होणार आहे. रमजानच्या महिन्याभरात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. शव्वाल महिन्याची चंद्रकोर दिसली की रोजा ची सांगता करून ईदचं सेलिब्रेशन सुरू केले जाते. मग यंदा या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही तुमच्या अनेक मित्रमंडळींना भेटू शकत नसलात तरीही सोशल मीडीयातून संपर्कात नक्की राहू शकता.

चांद रात मुबारक

Chand Raat Mubarak | File Image

 

चांद रात मुबारक । File Image

रात को नया चांद मुबारक,

चांद को चांदनी मुबारक,

फलक को सितारे मुबारक,

सितारों को बुलंदी मुबारक,

और आपको हमारी तरफ से,

चांद रात मुबारक!

Chand Raat Mubarak | File Image
चांद रात मुबारक । File Image

ऐ चांद, तू उनको मेरा पैगाम कह देना,

खुशी का दिन और हंसी की शाम देना,

जब वो करें तेरा दीदार बाहर आकर,

उनको मेरी तरफ से ईद मुबारक कह देना.

चांद रात मुबारक!

मुस्लिम बांधव Eid ul-Fitr हा सण शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात. आजची चंद्रकोर पाहून या नव्या महिन्याची सुरूवात होणार आहे तर आजचा सूर्यास्त हा पवित्र रमजान महिन्याची सांगता झाल्याचं सांगतो. मुस्लिम बांधव हा सण यंदादेखील पूर्वीप्रमाणे गळाभेट घेऊन साजरा करू शकणार नाही. ईदची नमाज देखील यंदा कोरोना संकटामुळे घरच्या घरी पडूनच ईद घराघरामध्ये साजरी केली जाणार आहे.

विविधतेमध्ये एकता असलेल्या भारतामध्ये यंदा 14 मे दिवशी मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करणार आहेत तर हिंदू बांधव त्यांचा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस अक्षय्य तृतीया साजरी करणार आहेत.