
ईद उल फितर ज्याला सर्वसामान्य पणे रमजान ईद (Ramzan Eid) किंवा गोड ईद म्हणून देखील ओळखली जाते. ही ईद इस्लामिक बांधवांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या शेवटाला साजरी केली केली जाते. ईस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान महिन्यानंतर दहावा महिना शव्वाल महिन्याचा पहिला दिवस हा ईद असतो. ही ईद मुस्लिम बांधवांसाठी आकाशात चंद्र दिसण्यावर अवलंबून असतो. यावर्षी जर 12 मे दिवशी चंद्र दिसला तर 13 मे दिवशी ईद साजरी होईल अन्यथा महिन्याचे 30 दिवस संपवून 14 मे दिवशी ईद (Eid) साजरी केली जाणार आहे. मग प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी आकर्षणाचा असलेला आणि आनंद घेऊन येणारा ईद चा चंद्र दिसल्यानंतर त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास चांद रात मुबारक (Chand Raat Mubarak) ग्रीटिंग्स (Greetings), मेसेजेस (Messages), GIFs, HD Images, Quotes शेअर करत तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
ईद चा चंद्र दिसल्यानंतर रमजान ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधव गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. नातेवाईक, मित्रमंडळी यांची गळाभेट घेत चांद मुबारक म्हणत ईदचं जंगी सेलिब्रेशन करतात. यावर्षी देखील हा ईदचा चंद्र पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. पण मागीलवर्षी प्रमाणे यंदाही कोविड 19 च्या सावटाखाली ईदचं सेलिब्रेशन करण्याचं सरकारचं आवाहन आहे. (नक्की वाचा: Simple Mehndi Design For Eid al-Fitr : ईद-अल-फितर साठी हातावर काढा 'या' सोप्या अरेबिक मेहंदी डिझाईन ) .
चांद मुबारक

चांद रात मुबारक

चांद रात 2021 मुबारक

अल्लाह तुमच्या सार्या आशा-अपेक्षा,
ईच्छा- कामना पूर्ण करो !
चांद रात मुबारक

चुपके से चांद की रोशनी छू जाए आपको,
धीरे से यह हवा कुछ कह जाए आपको,
दिल से जो चाहते हो वो मांग लो खुदा से,
हम दुआ करेंगे कि वो मिल जाए आपको.
चांद रात मुबारक !

खुदा करे कि हर रात चांद बनकर आए,
दिन का उजाला सुहानी शाम बनकर आए,
कभी ना दूर हो आपके चेहरे से मुस्कान,
हर दिन ऐसे मेहमान बनकर आए
चांद रात मुबारक !
रमजान हा मुस्लिम बांधवांसाठी खास महिना आहे. या महिन्यात रोजा अर्थात उपवास ठेवले जातात. या महिन्याभराच्या अल्लाहच्या आराधनेमध्ये आपल्या चूकांच्या प्रती देवाकडून माफी मिळते अशी धारणा असल्याने रमजान ईद ला त्याची सांगता करताना खास नमाज पठण करण्याची देखील रीत आहे.