
Happy Holi 2024 HD Images: देशभरात होळी (Holi 2024)चा उत्साह पाहायला मिळत आहे. होलिका दहन (Holika Dahan) हा दिवस फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो. होळी हा रंगांचा सण, हा सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक सण आहे. होळी हा परस्पर प्रेम, सद्भावना आणि बंधुभावाचा सण आहे. होळीसारखे सण कुटुंबाला समाजाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. सर्व धार्मिक भेदभाव विसरून खेळला जाणारा सण म्हणजे होळी. हा सण बंधुता आणि समतेचा संदेश देतो.
होळीच्या निमित्ताने एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देणारे संदेश WhatsApp Status, Messages द्वारे पाठवून मोठ्या उत्साहात रंगांचा सण साजरा करा. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - होळी' सणाच्या निमित्ताने 'या' खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या शुभेच्छा!)





फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल.