यावर्षी 12 नोव्हेंबरपासून दिवाळीला (Diwali 2020) सुरुवात झाली आहे. दिवाळीमधील शेवटचा आणि सर्वात सण म्हणजे भाऊबीज (Bhaubeej 2020). यावर्षी भाऊभीज 16 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. तसेच भाऊ- बहिण एकमेकांना भेटवस्तू देतात. परंतु, संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असून सध्या एकत्र येणे सर्वांसाठी कठीण झाले आहे. यामुळे सर्वत्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, असे असले तरीही ऑनलाईनच्या युगात आपल्या मित्र- मैत्रिण आणि नातेवाईकांना डिजिटल पद्धतीने शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात भर घालू शकतात.

भाऊबीजेच्या सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, भाऊबीज साजरी करताना प्रत्येकाला राज्य शासनाच्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. या काळात नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे बंधनकारक आहे. परंतु, असे असतानाही तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी खालील फोटो फायदेशीर ठरणार आहे. हे देखील वाचा- Bhaubeej 2020 Messages: भाऊबीज निमित्त SMS, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या आपल्या भावंडांना खास शुभेच्छा!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा-

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा-

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा-

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा-

दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच फटके देखील न फोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे.