Bhaubeej 2020 Messages: भाऊबीज (Bhaubeej) हा बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या वर्षी भाऊबीजेचा सण सोमवारी म्हणजेचं 16 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या सणाचे महत्तव रक्षाबंधन प्रमाणेचं आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. या सणास हिंदीत भाईदूज असं म्हणतात. या दिवशी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. या दिवशी बहीण आपल्या भावाला औक्षण करत करदोरा बांधते. खासकरून महाराष्ट्रात भाऊबीजेला भावाला करदोरा देण्याची प्रथा आहे.
यंदा भाऊबीजेच्या सणावरदेखील काही प्रमाणात कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. मात्र, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावडांना भाऊबीजेच्या शुभेच्छा नक्की देऊ शकता. भाऊबीजेला आपल्या लाडक्या भावडांना SMS, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा -Bhaubeej 2020 Date and Significance: यंदा भाऊबीज कधी? जाणून घ्या बहिण-भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या सणाचे महत्त्व)
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करते. या दिवशी भावाची पूजा करण्यामागे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा उद्देश असतो. या दिवशी भाऊ आपल्या बहिणींना त्याच्या परिस्थितीनुसार पैसे, कापड, दागिना आदी वस्तू ओवाळणी म्हणून देतो. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहीणीच्या घरी गोड जेवण करतो.