Bhaubeej 2019: जाणून घ्या बहिणीला अखंड सौभाग्य आणि भावाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी काय करावे
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

हिंदू धर्मात कार्तिक शुद्ध द्वितीयेला मोठ्या थाटामाटात भाऊबीजेचा (Bhaubeej) सण साजरा केला जातो. या दिवसाला 'यमद्वतिया' असेही म्हणतात. या सणानिमित्त बहिणी आपल्या भावाचे कर्तुत्व, दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी यमाकडे प्रार्थना करतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे खूप शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की जो भाऊ आपल्या बहिणीला या सणाच्या दिवशी प्रेमाने आणि आनंदाने भेटतो, तिच्या घरी जेवतो त्याला मृत्यूच्या भयातून मुक्ती मिळते. या दिवशी बहिणी भावाला औक्षण करून त्याच्या भाळी गंधाचा टिळा लावतात. त्यानंतर देवाजवळ त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. तर चला पाहूया अशा या पवित्र दिनी बहिणीचे अखंड सौभाग्य आणि भावाचे अखंड आयुष्य यांसाठी काय करावे.

> या दिवशी उपवास ठेवून, आपल्या भावाचे दीर्घायुष्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करा.

> यमाची पूजा केल्यानंतर यमुना आणि चित्रगुप्तची  पूजा करावी.

> औक्षण करताना तुटलेला तांदूळ वापरू नये.

> बहिणींच्या त्यागाच्या बदल्यात, भावानेही बहिणीच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी आणि तिच्या आवडीनुसार ओवाळणी द्यावी.

> असे मानले जाते की, या दिवशी बहिणीने यमुना नदीत स्नान करून भावाचे औक्षण केले तर भावाचे सर्व दोष नाहीसे होतात.

> औक्षण होईपर्यंत बहिणीसोबत भावानेही उपवास धरावा आणि बहिणीच्या हाताचे जेवण खाऊन तो उपवास सोडवा.

> भावाचे औक्षण करताना बहिणीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे.

> बहिण जर मोठी असेल तर भावाने तिला चरण स्पर्श करून तिचे आशीर्वाद घ्यावे.

> औक्षणानंतर बहिणीने आपल्या स्वत: च्या हातांनी बनवलेली खीर भावाला खायला द्यावी, यामुळे दोघांमधील गोड नाते टिकून राहते. (हेही वाचा: Bhaubeej 2019 Wishes: भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन मोठ्या आनंदात साजरा करा बहिण भावाच्या नात्याचा उत्सव)

> भाऊबीजेच्या दिवशी बहिणीपासून भाऊ जर का दूर असेल तर बहिण गायीला पहिला घास भारावून आपला उपवास तोडू शकते.

> औक्षण झाल्यानंतर बहिणीने भावाला नारळ द्यावा, असे करणे दोघांसाठी शुभ असते.

दरम्यान, या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.