
दिवाळीमधील बहिण भावाचे नाते, त्यामधील प्रेम वृद्धिंगत करणारा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaubeej). याच दिवशी यम आपल्या बहिणीकडे म्हणजेच यमीकडे जेवायला गेला होता, त्यामुळे कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने या दिवशी यमराजाची पूजा आणि प्रार्थना करावयाची असते. बहिणीने भावाचे औक्षण करून हा दिवस साजरा केला जातो. भारतात अनेक ठिकाणी भाईदूज नावाने हा सण साजरा होतो. उत्तर भारतात तर भाऊबीजेच्या दिवसाचे व्रतही ठेवले जाते. तर अशा या बहिण भावाच्या नात्याची वीण अजून घट्ट करणाऱ्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश





दरम्यान, या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत याच दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.