गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. आज 31 मार्च दिवशी या महिन्यातील दुसरी संकष्टी चतुर्थी आहे. 3 मार्चला यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी झाल्यानंतर आज 31 मार्च दिवशी फाल्गुन वद्य चतुर्थीला भालचंद्र संकष्टी आहे. दरम्यान दर महिन्यात पैर्णिमेनंतर येणार्या चौथ्या दिवशी संकष्टी (Sankashti Chaturthi ) साजरी केली जाते. या दिवसाला गणेशभक्तांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या दिवशी ते गणपती बाप्पाची पूजा अर्चना करऊन दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस हा उपवास सोडण्याची पद्धत आहे. या वेळी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवून गणरायाची आरती केली जाते. मग तुम्हांलाही रात्री बाप्पाची पूजा करून या संकष्टीचा उपवास सोडायचा असेल तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी मध्ये आजच्या भालचंद्र संकष्टी चतुर्थीची (Bhalachandra Sankashti Chaturthi) चंद्रोदयाची वेळ (Moonrise Timings) काय आहे?
आजची संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ
दरम्यान प्रत्येक शहरानुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळी चंद्रोदयाची वेळ आहे. त्यामुळे उपवास सोडण्याची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. Bhalchandra Sankashti Chaturthi 2021: भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.
रत्नागिरी- रात्री 9:36
मुंबई - रात्री 9:41
पुणे- रात्री 9:36
नाशिक- रात्री 9:38
सोलापूर- रात्री 9:26
नागपूर- रात्री 9: 17
कोल्हापूर- रात्री 9:32
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस असल्याने या मंगलमय दिवशी अनेकजण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात पण सध्या कोविड 19 चं संकट घोंघावत असल्याने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर सह अनेक मंदिरं भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. याऐवजी ऑनलाईन दर्शन खुलं करण्यात आले आहे.