Bhalchandra Sankashti Chaturthi 2021: भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
Lord Ganesha | Photo Credits: Instagram

Bhalchandra Sankashti Chaturthi 2021: हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येत महिन्यात चतुर्थी दोनदा येते. एकदा शुक्ल पक्षात आणि दुसरी चतुर्थी कृष्ण पक्षात. त्यानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख 31 मार्च 2021 रोजी पडत आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. असे म्हटलं जात की, भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या (Bhalchandra Sankashti Chaturthi) दिवशी गणेशाची पूजा केली तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या वेळी गणेश जीची आरती, त्यांचे मंत्र आणि चालिसा पूर्ण निष्ठेने पाठ केली जाते. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा शुभू मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात... (वाचा - Shiv Jayanti 2021 Guidelines: शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जाहीर)

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त -

  • भालचंद्र संकष्टी चतुर्थी बुधवार, 31 मार्च 2021 रोजी असून संकष्टी चंद्रोदय - रात्री 9 वाजून 39 मिनिटांनी असेल.
  • चतुर्थी प्रारंभ - 31 मार्च 2021, गुरुवारी दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी
  • चतुर्थी तारीख समाप्ती - 01 एप्रिल 2021, शुक्रवारी सकाळी 10 ते 59 मिनिटांपर्यंत

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व -

हिंदू दिनदर्शिकेनुसार संकष्टी चतुर्थी व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला साजरे केले जाते. हा उपवास गणेशभक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. कारण चतुर्थी तिथी ही गणपतीची आवडती तारीख आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाचे नाव घेतले जाते. असं म्हटलं जात की, जी व्यक्ती या दिवशी उपवास करते, त्याचे सर्व दुःख संपतात. म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात.