
Savitribai Phule Jayanti Images: महाराष्ट्रामध्ये समाजातील प्रत्येक घटकांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करणार्या क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिवस (Balika Diwas) साजरा केला जातो. हा दिवस महिला शिक्षण दिन (Mahila Shikshan Din) म्हणून देखील साजरा केला जातो. आज 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती (Savitribai Phule Jayanti) असल्याने आजच्या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो. मग या दिवसाच्या निमित्ताने सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि बालिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Messages, Wishes, Greetings, WhatsApp Stickers सोशल मीडियात शेअर करून या दिवसाच्या निमित्ताने मुलींच्या जन्माचंदेखील सेलिब्रेशन करायला विसरू नका.
महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा दिवस 1955 पासून 'बालिका दिन' म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. आता स्त्रिया केवळ 'चूल आणि मूल' इतक्याच चौकटीमध्ये अडकून न राहता बाहेर पडून काम करू लागल्याने त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी बालिका दिनाचं विशेष महत्त्व आहे. नक्की वाचा: Balika Diwas 2022: 3-12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राबवलं जाणार.
बालिका दिवस शुभेच्छा








महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीचं, त्यागाचं स्मरण म्हणून हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी पती ज्योतिबा फुले यांच्यासह महाराष्ट्रात शिक्षण चळवळ उभी केली. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा सुरु केल्या. जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे 'स्त्रियांनी शिकावे' हेच ब्रीदवाक्य होते.