Bakri Eid 2021 Mehandi Designs: बकरी ईद च्या खास दिवसासाठी हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन
Bakrid 2021 Mehndi Designs ( Photo- Instagram,)

उद्या (21 जुलै 2021) ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद चा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. मुस्लीम समाजातील पुरुष, महिला आणि मुले मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. या दिवशी बकरयाचा बळी दिला जातो आणि त्याला तीन भागात विभागले जाते. या दिवशी नवीन कपडे घातले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे अप्रतिम पदार्थ बनवले जातात. हा उत्सव साजरा करण्यासाठी महिला त्यांच्या हातावर मेहंदी काढतात.केवळ इस्लामच नाही तर सर्व धर्मातील स्त्रिया आपले विशेष सण साजरे करण्यासाठी त्यांच्या हात पायांवर मेहंदी काढतात. (Hari Raya Haji 2021 Wishes: ईद अल-अजहा निमित्ताने Messages, Greetings, Quotesद्वारा द्या Selamat Hari Raya Aidiladha च्या द्या शुभेच्छा)

आता बकरी ईद अवघ्या काही तासांवर आली आहे तर मग या खास दिवसासाठी तुम्ही ही तुमच्या हातावर मेहंदी काढण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी ईद च्या दिवशी काढता येतील अशा काही सोप्या सुंदर अशा मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात.

बकरी ईद स्पेशल फ्रंट हैंड मेहंदी

बकरी ईद स्पेशल मेहंदी

बकरी ईद स्पेशल चाँद मेहंदी

फ्लोरल अरेबिक मेहंदी डिझाइन

टिक्की मेहंदी डिझाइन

इस्लामच्या पाच कर्तव्यात समाविष्ट असलेल्या हज यात्रेच्या समाप्तीच्या आनंदात ईद-उल-जुहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जातो. याला बडी ईद असेही म्हणतात आणि इस्लाममध्ये त्याचे खुप महत्त्व सांगितले गेले आहे.