File image of Muslims (Photo Credits: IANS)

ईद उल फितर च्या 70 दिवसानंतर बकरीद हा सण मुस्लिम धर्मीय लोक साजरा करतात. ईद उल जुहाच्या वेळी, मुस्लिम ईदगाह किंवा मशिदीत जमतात आणि जमातबरोबर नमाजच्या 2 रकात अर्पण करतात. ही प्रार्थना सहसा सकाळी आयोजित केली जाते. बकरी ईद लोकांना सत्याच्या मार्गावर बलिदान देण्याचा संदेश देते. हजरत इब्राहिमच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अधा साजरा केला जातो. अल्लाहच्या आज्ञेची निष्ठा दर्शविण्यासाठी हजरत इब्राहिमने आपला मुलगा इस्माईलला बलिदान देण्याचे मान्य केले होते. जेव्हा हजरत इब्राहिम आपल्या मुलाचे बलिदान देण्यास पुढे गेले, तेव्हा अल्लाहने त्यांना इस्माइलच्या जागेवर कोणत्या तरी जनावराला बळी देण्यास सांगितले. (Bakra Eid Mubarak Wishes: बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद)

यंदा भारतात बकरा ईद कधी आहे?

2021 साली बकरीद 19 किंवा 20 जुलै रोजी साजरा केला जाईल. यंदा भारतात ईद 19 किंवा 20 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.परंतु ही तात्पुरती तारीख आहे कारण ईद-उल-अधाचा चंद्र दिसल्यानंतरच तारीख जाहिर होणार. बकरीदची तारीख एक दिवस आधी किंवा मागे होऊ शकते.  ईद उल अजहा इस्लामीक कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना आहे.

बकरीद च्या दिवशी काय केले जाते?

बकरा ईद दिवशी प्रथम मशिदींमध्ये जाऊन नमाज केले जाते . यानंतर बकऱ्याचा बळी दिला जातो. त्यानंतर त्याचे तीन भागात विभाजन केले जाते.  यापैकी एक भाग गरिबांना तर दुसरा भाग मित्र व नातेवाईकांना दिला जातो. त्याच वेळी, तिसरा भाग कुटुंबासाठी ठेवला जातो .