Bakra Eid Mubarak Wishes: बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद
Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

Eid al Adha 2019 Marathi Messages & Wishes: देशभरात यंदा 12 ऑगस्ट दिवशी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार 12 व्या महिन्यात धू-अल-हिज्जा च्या 10 तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद (Bakra Eid) येते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. या दिवशी बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा आहे. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सेलिब्रेशननंतर बकरी ईदचं विशेष महत्त्व असतं. मग या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या मुस्लीम मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) , फेसबूक (Facebook) मेसेज आणि स्टेट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र, HD Images, GIFs,मेसेजेस शेअर करून या सणाच्या नक्की शुभेच्छा द्या.

बकरी ईद दिवशी खास मटण रेसिपींचा आस्वाद घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये बकरी ईदचा सण धूम धडाक्यात साजरा केला जातो. पण यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही पावसाने थैमान घातल्याने कुर्बानी ऐवजी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. Bakri Eid 2019 Mutton Recipes: यंदाची बकरी ईद चमचमीत करायची असेल तर नक्की ट्राय करा या लज्जतदार, मसालेदार मटणाच्या रेसिपीज

बकरी ईद मुबारक शुभेच्छा

Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची...

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची

ईद मुबारक!

Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा...

बकरीद मुबारक!

Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना

बकरी ईद च्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा...

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…

आमीन!

ईद मुबारक

Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो

ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

बकरी ईद मुबारक!

Eid Mubarak (Photo Credits: File Photo)

ईद मुबारक!

via GIPHY

via GIPHY

बकरी ईदच्या  शुभेच्छा

मुस्लिम मान्यता अनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल ला याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाह ने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पर्व साजरा केला जातो.