Akshaya Tritiya 2020: हिंदू धर्मात सणांना विशेष महत्व आहे. त्यात हिंदू धर्मानुसार, वर्षातील शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे म्हणजे साडे तीन मुहूर्त. ज्यात दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि दिवाळीतील पाडवा हा अर्धा असे साडेतीन मुहूर्त आहेत. यातील अक्षय्य तृतीया हा मुहूर्त देखील महत्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करु शकतात. हे चारही दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी मुहूर्ताची गरज नसते. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. यंदा २६ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचे जरी अक्षय्य तृतीयावर सावट असले तरीही आपण घरच्या घरी पूजा करून हा दिवस साजरा करु शकता. Akshaya Tritiya 2020 निमित्त ऑनलाईन सोने खरेदी करण्यासाठी '5' पर्याय!
अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त
यंदा अक्षय्य तृतीया पुजेचा शुभ मुहूर्त 26 एप्रिल रोजी पहाटे 5.45 मिनिटांपासून ते दुपारी 12.19 असा आहे. तर अक्षय्य तृतीयेला 25 एप्रिल सकाळी 11 वाजून 51 मिनिटांला सुरू होऊन 26 एप्रिल रोजी दुपारी 1.22 मिनिटाला संपेल. Akshaya Tritiya 2020 Messages: अक्षय्य तृतीये निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून साजरा करा हा शुभ दिवस!
अक्षय्य तृतीया पूजा विधी
अक्षय्य तृतीया दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र जलात स्नान केले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे घरच्या घरी अक्षय्य तृतीयेची पूजा करावी. नेहमीप्रमाणे प्रातःविधी उरकल्यानंतर स्नान करुन पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावीत. दोन्ही देवतांचे आवाहन करावे. पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद-कुंकू वाहावे. उपलब्ध फुले अर्पण करावीत. तुळशीची पाने वाहावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी. यथाशक्ती दान करावे.
नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, मातीत आळी घालून पेरणी करणे, शेतजमिनीची मशागत, नवीन वाहन खरेदी करणे अशा गोष्टी अक्षय्य तृतीया दिवशी केल्या जातात.