Wedding Fashion Tips For Women: डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच आपल्याकडे थंडी आणि लग्नाचा सीझन सुरु होतो. लग्न समारंभ हा जरी दोन माणसांचा आणि जास्तीत जास्त चार दिवसांचा एक सोहळा असला तरी याची तयारी फार आधीपासून केली जाते. लग्नाच्या हॉल पासून जेवणापर्यंत आणि नवरा-नवरीच्या एंट्रीपासून दमदार रिसेप्शन पर्यंत सर्व काही अगदी रॉयल असेल याकडे सर्वचजण आपापल्या परीने लक्ष देत असतात. या साऱ्यांमध्ये अति बारकाईने पाहिलं जाणारं डिपार्टमेंट म्हणजे लग्नाच्या वेगवेगळ्या विधीला घालायचे कपडे. थंडीमधील लग्नासाठी फॅशन करणं म्हणजे एक टास्कच असतं. तुम्हालाही यंदा अनेक लग्नांची आमंत्रणं आली असतील ना? या लग्नानं काय कपडे घालू हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका यंदा या वेडिंग स्पेशल लेखातून आम्ही तुम्हाला थंडीतील लग्नसराईत फॅशन कशी करावी याबद्दल काही टिप्स देणार आहोत.
आजच्या या आर्टिकल मधून शरीराला उबदार ठेवतच स्टायलिश वाटेल असे लूक कसे साकारावेत हे आपण पाहणार आहोत..
डेनिम/शर्ट लेहेंगा
लग्न म्हणताच डिझायनर लेहेंगा आणि बॅकलेस चोळी हा पर्याय अगदी आवर्जून आठवतो, पण थंडीत असे कपडे घालून नंतर कुडकुडत बसणं किंवा शॉल स्वेटर घालून तुमचा लूक खराब करणं कुणालाच परवडणार नाही. याऐवजी तुम्ही एखाद्या लेहेंग्याच्या सोबत डेनिम टॉप किंवा जाडसर शर्ट पेअर करू शकाल यावर रेग्युलर ज्वेलरी आणि मांग टीका हा ऑप्शन करवल्यांसाठी बेस्ट ठरेल.
एम्ब्रॉयडरी वेल्व्हेट ड्रेस
वेल्व्हेट कापड टच साठी खूपच मऊशार आणि उबदार असतं, त्यामुळे शरीराला थंडी बोचत नाही शिवाय एका गाऊन मध्येच तुमचं ज्वेलरीपासून ते ड्रेस पर्यंत सगळं काही साध्य होतं. लग्नात धावाधाव करताना कपड्यांचं वजन कमी ठेवण्यासाठी हा पर्याय मदत करेल.
जॅकेट आणि साडी
तुम्ही जुन्या सिनेमामध्ये स्वेटरवर साडी नेस्ताना हिरोइन्स पहिल्या असतील तसाच काहीसा प्रकार आपणही करू शकता मात्र आपल्याला हे साडीचे लेयर्स थोडे काळजीपूर्वक निवडायचे आहेत. मळकट स्वेटर ऐवजी एखादे ट्रेंडी जॅकेट घालून तुम्ही त्यावर पदर घेऊ शकता. याशिवाय साडीच्या वरून एखादं मॅचिंग जॅकेट घालूनही हा लूक पूर्ण करता येईल.
फुल स्लिव्ह्ज ड्रेस किंवा ब्लाउज
पूर्ण हात असणारे कपडे आऊट ऑफ फॅशन आहेत असा विचार करत असाल तर थोडीशी गफलत होत आहे. फार दागिने न घालता आणि किमान मेकअप करून तुम्ही हा ड्रेस देखील रॉक करू शकता. यासाठी थोडे सॉलिड रंग निवडावेत जे तुम्हाला खुलून दिसतील.
कुर्ती आणि पलाझो
लग्नात डान्स करण्याचा प्लॅन असेल तर लेहेंगा किंवा साडी मध्ये अडकण्यापेक्षा तितकीच पायघोळ असणारी पलाझो पॅंट तुम्हाला फायद्याची ठरेल. भरजरी कुर्ता आणि त्याखाली मॅचिंग पलाझो आणि त्यावर अगदी लेहेंग्याला शोभेल असा मेकअप करून तम्ही कम्फर्ट आणि फॅशन एकत्र साधू शकता.
लग्नात मुख्य जोडपं आणि त्यांचं कुटुंब सोडल्यास आणखीन काही मंडळी विशेष भाव खाऊन जातात आणि ती म्हणजे मुलामुलीकडची मित्रमंडळी! नवरीच्या करवल्या तर भरजरी कपडे, दागिने वैगरे घालून तोडीसतोड सजून, आपल्या लाडक्या मैत्रणीचा आनंद साजरा करत असतात.यंदाच्या या लग्नसराईत जर का तुमच्याही एखाद्या मैत्रणीच लग्न ठरलं असेल तर हे लूक नक्की ट्राय करून पहा..