![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/25_09_2019-puja-desai_19611237_8338406-380x214.jpg)
भारतीय विवाहित महिला म्हणजे म्हणजे चूल आणि मूल सांभाळणे असं समीकरण मोडीत काढीत स्वत: मधील कलागुणांना वाव देत वडोद-याची पूजा देसाई (Pooja Desai) हिने मिसेस इंडिया 2019 हा किताब पटकावला आहे. भारतामध्ये अनेक महिला लग्नानंतर आपली खरी ओळख बाजूला ठेवून संसारात रमलेल्या दिसतात. अशा भारतात लग्नानंतर सौंदर्यवतीची स्पर्धा जिंकणे ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. 24 सप्टेंबर रोजी वडोदरा (Vadodara) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस इंडिया 2019 विजेतेपदावर आपले नाव कोरले. पूजा ने आतापर्यंत 4500 हून अधिक स्पर्धा केल्यानंतर मिसेस इंडिया 2019 च्या विजेतेपदावर नाव कोरु शकली आहे.
ANI ला दिलेल्या मुलाखतीत पूजा ने सांगितले की, या स्पर्धेसाठी आम्हाला रोज सकाळी 7.30 वाजता रिपोर्ट करावे लागायचे. त्यानंतर संपुर्ण दिवस आमची ट्रेनिंग असायची. त्यानंतर दिवसा 2 वाजता आम्ही रॅम्प चा अभ्यास करायचो. हे सर्व खूपच कठीण आणि आव्हानात्मक होते. मात्र यामुळे माझ्या आयुष्यात बराच बदल झाला. हेही वाचा- Femina Miss India 2019: मिस इंडिया 2019 ची विजेती सुमन राव नेमकी आहे कोण? जाणून घ्या तिचं संपूर्ण प्रोफाइल
तसेच याचा उपयोग मला माझे व्यक्तिमत्व सुधारण्यास आणि आणखी खुलवण्यासाठी झाला.
त्यानंतर असे विचारण्यात आले की काम आणि व्यक्तिगत जीवन यांच्यात समतोल कसा राखलास? त्यावर त्या म्हणाल्या की, जर एखाद्या महिलेने ठरविले, की हे आपल्याला करायचच आहे, तर त्यानुसार ती तिचे वेळापत्रक बनवू शकते. लग्नानंतर अनेकदा आपण आपल्या मुलांमुळे आणि सासरच्या मंडळींच्या जबाबदारी स्विकारत असताना स्वत:ची ओळख विसरून जातो. मात्र माझे असे म्हणणे आहे की यातून बाहेर पडणे जरूरी असून स्वत:तील कलागुणांना वाव दिला पाहिजे.