फेमिना मिस इंडिया 2019 (Femina Miss India 2019) चा सोहळा काल 15 जून रोजी मुंबईत पार पडला. सरदार वल्लभभाई पटेल इंडोर स्टेडियममध्ये रात्री 8 वाजल्यापासून या दिमाखदार सोहळ्याला सुरुवात झाली होती सरतेशेवटी भारताला यावर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. राजस्थानच्या सुमन राव (Suman Rao) ने या सौंदर्यस्पर्धेत फेमिना मिस इंडिया विजेतीचा किताब पटकावत थायलंड येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड पेजेंट साठी आपले स्थान पक्के केले आहे.या वर्षी 7 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर पार पडणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत सुमन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे मात्र त्याआधी ही मिस इंडिया नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.चला तर मग जाणून घेऊ या सौंदर्यसम्राज्ञीच्या काही अजाण पैलूंविषयी..
- नाव: सुमन राव
- जन्मतारीख: 23 नोव्हेंबर 1996
- वय: 23 वर्षे
- उंची: 5'10
- शिक्षण: सुमन मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याआधी नवी मुंबईतील महात्मा एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षण घेत होती. सुमन ही सीए ची विद्यार्थिनी होती त्यामुळे सौंदर्यसोबतच तिला बुद्धीचे वरदान देखील प्राप्त झाले आहे असे म्हणायला हरकत नाही.
- पूर्वकामगिरी: सुमन रावने Miss Uttar Pradesh 2019 चाही किताब जिंकला आहे तसेच सुमन हिने 2018 मध्ये पार पडलेल्या मिस नवी मुंबई सौंदर्य स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवला होता आणि तेव्हापासूनच या प्रवासाला सुरवात झाली.
सुमन राव हिने मिस इंडिया सोहळ्या दरम्यान स्वतःची ओळख करून देताना स्वतःला अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी प्रयत्न करणारी एक सौम्य, दयाळू आणि जमिनीवर पाय ठेवून जगणारी मुलगी म्हणून सांगितले होते. तर महिला सबलीकरणाच्या बाबत भाष्य करत तिने महिलांना स्वतःवर विश्वास ठेवून इतर महिलांना मदत करण्याची गरज आहे अस सल्ला दिला होता.