Miss Universe 2018 Winner:  फिलिपीन्स देशाची सुंदरी Catriona Gray ने पटकावला Miss Universe 2018 चा किताब!
Miss Philippines Catriona Gray is Miss Universe 2018 (Photo Credits: Instagram)

Miss Universe 2018 Winner:  2018 चा मिस युनिव्हर्सचा किताब फिलिपीन्स देशाची सुंदरी Miss Philippines Catriona Gray ने पटकावला आहे. थायलंड देशामध्ये यंदाची मिस युनिव्हर्सची स्पर्धा रंगली. दक्षिण आफ्रिकेच्या Demi-Leigh Nel-Peters या सौंदर्यवतीकडून Catriona ला मुकूट मिळाला. अंतिम फेरीमध्ये फिलिपिन्सची (Philippines) Catriona Gray, दक्षिण आफ्रिकेची Tamaryn Green आणि व्हेएन्झुएलाच्या Sthefany Gutiérrez यांच्यामध्ये स्पर्धा रंगली.Miss Philippines Catriona Gray या प्रश्नाच्या उत्तराने ठरली Miss Universe 2018!

यंदाच्या 67 व्या मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेचं सूत्रसंचालन विनोदी कलाकार आणि टीव्ही होस्ट

Steve Harvey यांनी केलं. दक्षिण आफ्रिकेची Tamaryn Green पहिली रनर अप तर व्हेएन्झुएलाच्या Sthefany Gutiérrez ला दुसर्‍या रनर अप पदावर समाधान मानावं लागलं आहे.Miss World 2018: नवी विश्वसुंदरी Vanessa Ponce De Leon बद्दल या खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

1992,2005 नंतर यंदा तिसर्‍यांदा थायलंडने सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये जगभरातील 94 देशातील तरूणींनी सहभाग घेतला होता. Nehal Chudasama ही Miss Diva 2018 ठरलेल्या भारतीय तरूणीने Miss Universe 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.