व्हेनेसा पोन्स डी लिऑन (Photo Credits: Miss World/Instagram)

काल चीनच्या सान्या शहरात मिस वर्ल्ड (Miss World) स्पर्धेत ‘मिस वर्ल्ड 2018’चा किताबाचा मान व्हेनेसा पोन्स डी लिऑन  (Vanessa Ponce De Leon) हिने पटकावला. गेल्या वर्षीची मिस वर्ल्ड ठरलेल्या भारताच्या मानुषी छिल्लरने (Manushi Chillar) व्हेनेसाला विश्व सुंदरीचा ताज घातला. या स्पर्धेत मिस इंडिया अनुकृति वास (Anukreethy Vas) टॉप 30 मध्ये दाखल झाली होती. मात्र टॉप 12 मध्ये ती आपले स्थान निश्चित करु शकली नाही. Miss World 2018: आज जगाला मिळणार नवी विश्व सुंदरी; Anukreethy Vas कडे भारतीयांचे लक्ष

अखेर मेस्किकोच्या (Mexico) व्हेनेसा ला मिस वर्ल्डचा किताब मिळाला. तर थायलंडची निकोलेन पिशापा उपविजेती ठरली. नव्या विश्व सुंदरीविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी...

# मेक्सिकन मॉडेल व्हेनेसा 26 वर्षांची असून तिचा जम्न 7 मार्च 1992 मध्ये झाला.

 

View this post on Instagram

 

@vanessaponcedeleon @missworld @missmexicoorg Felicidades #missworld #missworld2018 #missmundo

A post shared by mxumissmexico Missosology (@mxumissmexico) on

# मिस वर्ल्डचा मान मिळविणारी ही पहिलीच मेक्सिकन तरुणी आहे.

# 2014 पासून मॉडेलिंग करत असलेली व्हेनेसा सामाजिक कार्यातही सहभाग घेते.

# व्हॉलीबॉल खेळणे आणि पेटिंग करणे हे तिचे छंद आहेत.

# व्हेनेसा उत्तम स्कूबा डायव्हर देखील आहे.

# व्हेनेसाने International Commerce मध्ये University of Guanajuato मधून पदवी संपादन केली असून ह्युमन राईट्समध्ये (Human Rights) डिप्लोमाही केला आहे.

# तिने मिस वर्ल्ड मेक्सिकन 2018 (Miss World Mexico 2018) हा किताब 5 मे रोजी पटकावला आहे.

चीनमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत भारताशिवाय नेपाळ, न्युझीलँड, सिंगापूर, चिली, फ्रान्स, बांग्लादेश, जपान, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको यांसारख्या एकूण 118 देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.