Miss Universe 2018 Winner: Miss Philippines Catriona Gray या प्रश्नाच्या उत्तराने ठरली  Miss Universe 2018!
Catriona Gray (Photo Credit: Instagram/ metromagph and lofficielthailand)

Miss Universe 2018:  बॅंकॉकमध्ये पार पडलेल्या 67व्या 'Miss Universe' या सौंदर्यस्पर्धेमध्ये फिलिपाईन्स देशाची सौंदर्यवती Catriona Gray ने बाजी मारली आहे. 93 देशातून सहभागी झालेल्या सौंदर्यवतींवर मात करून 24 वर्षीय Catriona Gray या तरूणीने Miss Universe 2018 चा किताब पटकावला आहे. अंतिम सामन्यात Catriona Gray सोबत दक्षिण आफ्रिका आणि व्हेएन्झुएलाच्या स्पर्धकांचं आव्हान होतं. मात्र चोख,संयमी आणि विचारपूर्वक उत्तरांच्या जोरावर फिलिपिन्सच्या सौंदर्यवतीने केवळ परिक्षकांचे नव्हे तर उपस्थितांच्याही टाळ्या मिळवल्या. पहा टॉप 5 आणि टॉप 3 मध्ये Catriona Gray ला कोणते प्रश्न विचारण्यात आले होते?

टॉप 5 मधील प्रश्न हा कॅनडामध्ये गांजा बाळगणं, विक्री करणं याला मिळालेली कायदेशीर परवानगी यावर मत विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय वापरासाठी गांजा वापरणं ठीक आहे मात्र नशेसाठी चांगलं नसल्याचं मत व्यक्त केलं. त्यापुढे मग सिगारेट आणि अल्होलचं काय ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल पण सारे काही प्रमाणात घेणंच योग्य असल्याचं सांगत Catriona Gray ने आत्मविश्वासपूर्वक स्वतःच्या उत्तराचं समर्थन केल.

टॉप 3 म्हणजेच अंतिम टप्प्यावर आल्यानंतर Catriona Gray ला तु आयुष्यात कोणती अशी गोष्ट शिकलीस की ज्याचा भविष्यात Miss Universe म्हणून तुला उपयोग होऊ शकतो.

Catriona Gray उत्तर देताना म्हणाली, मी काही स्लम, गरीबी असलेल्या भागामध्ये काम केले आहे. तेथील अवस्था अत्यंत दयनीय होती मात्र मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची चांगली बाजू बघण्याची सवय आहे. जर आपण समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीसाठी कृतज्ञतापूर्वक राहल्यास, त्यातील चांगली बाजू बघायचं ठरवलं तर या जगातून नकारात्मकता दूर होईल.