
महिलांना नखं वाढवणे फार आवडते. कारण नखं वाढवून त्यावर नेल आर्ट करणे हा सध्या एक ट्रेन्ड बनला आहे. परंतु काही जणांची अशी तक्रार असते की त्यांची नखं वाढत नाही. खरंतर कॅल्शिअमची कमतरता किंवा अन्य काही कारणामुळे नखं वाढली जात नाहीत. परंतु तुमची नखं वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत त्याचा वापर तुम्ही नक्की करु शकता. काही जणांना नखं खाण्याची अत्यंत वाईट सवय असते. त्यामुळे यात विविध प्रकारचे बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते. जे तुमच्या तोंडाद्वारे पोटात जाऊन तुम्हाला आजारासाठी बळी पाडू शकतात. नखं खाल्ल्याने त्यांची होणारी वाढ सुद्धा काही प्रमाणात खुंटते. तर जाणून घ्या नखं वाढवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत.
- नारळाचे तेल नखं वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हे तेल नखांना लावल्यास त्यांची वाढ होण्यासोबत ते अधिक मजबूत होतील. जेणेकरुन नखं तुटण्याची भीती राहणार नाही.
- संत्र्यांचा ज्यूस 10 मिनिटे नखांवर लावल्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. असे केल्याने नखांची वाढ होण्यास मदत होईल. तसेच संत्र्यांची साल सुद्धा नखांवर घासल्यास नखं लवकर वाढतात.
-गरम पाण्यात लिंबूचा रस टाकून त्या मिश्रणात 5 मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यानंतर लगेच हात थंड पाण्यात ठेवा.(चष्म्यामुळे येणारे डाग हटवण्यासाठी 'या' सोप्या टीप्स)
तसेच नखं वाढवण्यासाठी लसूण नखांवर घासल्याने नखं वाढतात. तर हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळेस केल्यास फार उपयोगी येईल. एवढेच नाही तर ऑलिव्ह ऑइल सुद्धा नखं वाढवण्यास मदत करतात. यामध्ये विटामीन ई असून ते नखांना पोषक तत्व असतात. त्यामुळे नखं वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध तेल किंवा क्रिमचा वापर न करता घरगुती पद्धतीचा वापर करा.