28 जुलै 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.
मेष: या राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी प्रकृतीकडे जास्त लक्ष द्या. घरातील मंडळींशी आदराने वागा. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल. प्रिय व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा.
शुभ उपाय- कुबेर मंत्राचे पठन करा.
शुभ दान- फळ दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- निळा
वृषभ: कामात चुका होतील परंतु नीट लक्ष देऊन केल्यास ती पूर्ण करता येतील. आई-वडिलांची साथ लाभेल. बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची गोष्ट कळेल.
शुभ उपाय- वडाच्या झाडाला पाणी घाला.
शुभ दान- भुकलेल्यांना अन्न दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- करडा
मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी आज दुसऱ्यावर पैसे खर्च करणे टाळा. घरात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आई-वडिलांशी आदराने वागा. प्रिय व्यक्ती तुम्हाला तुमचा चुका समजून देण्याचा प्रयत्न करेल. सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
शुभ उपाय- शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
शुभ दान- वृद्ध व्यक्तींना वस्र दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पिवळा
कर्क: या राशीतील व्यक्तींनी आज वाहन सावधपणे चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. घरातून निघण्यापूर्वी आई-वडिलांचा आशिर्वाद घ्या. मित्रपरिवारासह नव्या गोष्टी शिकण्यास तयार रहा. प्रिय व्यक्तीकडून तुमचे आज कौतुक केले जाईल.
शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.
शुभ दान- रक्तदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- हिरवा
सिंह: राशीतील व्यक्तींनी आज संभाळून काम करा. अतिघाई संकटात नेई अशी स्थिती स्वत:वर ओढवून घेऊ नका. आई-वडिलांचा मान राखा. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल
शुभ उपाय- अर्धा कप दुध प्या.
शुभ दान- राईचे तेल दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पांढरा
कन्या: आज तुमच्या जवळ राहिलेली कामे करण्यासाठी वेळ असेल. त्यामुळे कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल.
शुभ उपाय- गाईला चारा द्या.
शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या
शुभ अंक- 2
शुभ रंग- सोनेरी
तुळ: आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.
शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सुप प्या.
शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- करडा
वृश्चिक: व्यवसायात थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.
शुभ उपाय- कुत्र्याला दूध द्या.
शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- पांढरा
धनु: तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.
शुभ उपाय- ब्राम्हणाला जेवण द्या.
शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
मकर: कायद्यासंबंधित कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची साथ लाभेल. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल.
शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.
शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- जांभळा
कुंभ: आजच्या दिवशी कुंभ राशीतील व्यक्तींना धनलाभ होणार आहे. परंतु आजारपणावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारधंद्यातील मंडळींचे थकीत पैसे परत मिळणार. मात्र कोणत्याही कामातील निर्णय घाईमध्ये घेणे टाळा.
शुभ उपाय- भगवान शंकराची उपासना करा.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळ
मीन: राशीमधील व्यक्तींना आज विदेशातून शुभ संकेत मिळतील. तसेच मित्रपरिवारासह आज तुम्हाला दिवस घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहिल परंतु पूर्ण काम करण्यासाठी आळशीपणा कराल. घरातील मंडळींची साथ लाभेल.
शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा.
शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.
शुभ अंक- 5
शुभ रंग- आकाशी