आजचे राशीभविष्य:15 फेब्रुवारी 2019 जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

15 फेब्रुवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींसाठी आज तुम्ही प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढेल. घरातील मंडळींशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणी अडथळे येत असतील तर शांततापूर्ण पद्धतीने त्याचे निरसन करा. प्रिय व्यक्तीशी भेट होईल.

शुभ उपाय- घरात गोमूत्र शिंपडा

शुभ दान- गरजू व्यक्तीला मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

वृषभ: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. प्रिय व्यक्तीशी भांडण करु नका. घरातील मंडळींची साथ लाभेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

शुभ उपाय- देवाला तुपाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 5

शुभ रंग- गुलाबी

मिथुन:मिथुन राशीतीव व्यक्तींनी थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. गुंतवणूकीच्या ठिकाणी नफा होण्याची शक्यता आहे. घरातील मंडळींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीसह आजचा दिवस उत्तम जाईल.-

शुभ उपाय- कच्चे दुध पिऊन घराबाहेर पडा

शुभ दान- पुस्तकदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पांढरा

कर्क: या राशीतील व्यक्तींनी पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जबाबदारी स्विकारा. प्रिय व्यक्तीला छानसे गिफ्ट द्या. घरातील मंडळींकडून शुभ वार्ता कळेल.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पिवळा

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींना आजचा दिवस उत्तम जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. घरातील मंडळींशी आदराने वागा. प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.

शुभ उपाय- काळे कपडे घालू नका.

शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आज नियोजनपूर्ण कामे करा.घरातील मंडळींसोबत प्रवासाला जाता येईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाने वागा.

शुभ उपाय- ब्राम्हणाला जेवण द्या.

शुभ दान- गरजू व्यक्तींना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- सोनेरी

तुळ: या राशीतील व्यक्तींना मानसिक ताणतणावावर मात करा. देवाची उपासना करा. घरातील मंडळींची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीला बाहेर फिरायला घेऊन जा. कामाचा उत्साह वाटेल.

शुभ उपाय- घरात तुपाचा दिवा लावा.

शुभ दान- दुध दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- आकाशी

वृश्चिक: वृश्चिक राशीतील मंडळींना आज नातेवाईकांसोबत वेळ घालवता येईल.प्रिय व्यक्तीशी वाद घालू नका. नोकरीच्या ठिकाणी कामात यश येईल. मित्र परिवारासोबत वेळ घालवता येईल.आर्थिक चणचण भासेल.

शुभ उपाय- दही खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- गरजूंना जेवण द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- हिरवा

धनु: धनु राशीतील व्यक्तींना आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र मंडळींशी बाहेर जाता येईल. अतिरिक्त खर्च करणे कमी करा. प्रकृतीची काळजी घ्या. घरातील मंडळींच्या सहाय्याने कामे पूर्ण करा.

शुभ उपाय- देवाला दुध-साखर दाखवा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पोपटी

मकर: या राशीतील व्यक्तींना आज आर्थिक दृष्ट्या चिंता भासेल. जोडीदाराकडून तुम्हाला उत्तम साथ लाभेल. घरातील तणावापासून दूर रहा. नोकरीच्या ठिकाणी कामे काळजीपूर्वक करा.

शुभ उपाय- देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूंना मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- सोनेरी

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. तुमची प्रियकर व्यक्ती तुम्हाला फोन करुन सतावण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मीन: मीन राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. मित्र परिवारात गप्पागोष्टी करताना विचारपूर्वक बोला. प्रियकर व्यक्तीसोबत आजचा दिवस तुमचा चांगला जाईल.

शुभ उपाय- गाईला खिचडीचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरीब आजारी व्यक्तींना फळ दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी