राशीभविष्य 7 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

7 मार्च 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: आजचा दिवस मेष राशीतील व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. घरातील खास कामासाठी तुमचे मत अमूल्य ठरणार आहे. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- गणपतीची पूजा करा.

शुभ दान- मंदिरात पीठ दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- केशरी

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. जुन्या कामांची सुरुवात पुन्हा एकदा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.प्रिय व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी.

शुभ उपाय- लाल रंगाचे वस्त्र देवाला अर्पण करा.

शुभ दान- अभ्यासू विद्यार्थ्यांना पुस्तक दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- करडा

मिथुन: या राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी व्यवसायात थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुने ताणतणाव कमी होतील. नवरा-बायकोमधील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नकारात्मक असणार आहे.

शुभ उपाय- दही खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे. कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवाल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- अंथरुण दान करा.

शुभ अंक-1

शुभ रंग- गुलाबी

सिंह: आजच्या दिवशी सिंह राशीतील व्यक्तींची कामासंबंधित नवीन व्यक्तींची ओळख होण्याची शक्यता आहे.नोकरीच्या ठिकाणी नवी संधी उपलब्ध होतील. प्रिय व्यक्तीची चिंता सतावेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ उपाय- दोन रुपयांचे नाणे पाकिटात ठेवा.

शुभ दान- केशरी रंगाचे वस्त्रदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पोपटी

कन्या: व्यवसायात थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज नव्या संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

शुभ उपाय- कुत्र्याला दूध द्या.

शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आनंदाची बातमी कळेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईंकांची गाठभेट होईल. पैशांच्या व्यवहारात सावधागिरी बाळगा. प्रिय व्यक्तींच्या भावनांचा आदर करा.

शुभ उपाय- घरात गोमूत्र शिंपडा.

शुभ दान- गरीबांना अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- क्रिम कलर

वृश्चिक: वृश्चिक राशीतील व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात घाईत निर्णय घेऊ नका. मित्रपरिवारासह वेळ घालवाल. परिवारातील ताणतणापासून दूर रहा.

शुभ उपाय- गणपतीला दुर्वा-जास्वंदाचे फुल अर्पण करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

धनु: या राशीतील व्यक्तींना आजचा दिवस तणावपूर्वक राहणार आहे. घरातील वादाचे वातावरण निर्माण होईल. घरातील व्यक्तींचा आदर करा. प्रिय व्यक्तीच्या भावना दुखावू नका.

शुभ उपाय- दही खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला जेवण द्या.

शुभ अंक- 9

शुभ रंग- हिरवा

मकर: मकर राशीतील व्यक्तींना व्यवसायात फायदा होणार आहे. जुन्या मित्राची भेट होईल. शुभ कामाची सुरुवात करण्यास आजचा दिवस उत्तम असणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.

शुभ उपाय- खडीसाखर खा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पिवळा

कुंभ: आजच्या दिवशी महत्वाची कामे पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी विचारपूर्वक बोला. मित्रपरिवारासह बाहेर वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. घरातील वातावरण थोडे तणावाचे राहील.

शुभ उपाय- हनुमानच्या मंदिरात तेलाचा दिवा दाखवा.

शुभ दान- आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

मीन: मीन राशीतील व्यक्तींना कामात अडथळे येतील. परंतु शांततेने कामे केल्यास ती पूर्ण होतील. पैशांच्या व्यवहरात सावधानता बाळगा. प्रिय व्यक्तीकडून कामाचे कौतुक होईल. नव्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी देवाचे नाव घ्या.

शुभ उपाय- दिवसातून दोन वेळा पाय धुवा.

शुभ दान- मंदिरासाठी देणगी द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल