राशीभविष्य 6 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

6 मार्च 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: मेष राशीतील व्यक्तींनी आज चुकीच्या कामापासून दूर रहा. जास्त पैसे खर्च करणे टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि मनपूर्वक कामे करा. घरातील काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- गरीबांना जेवण खाऊ घाला.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

वृषभ: आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. वादविवाद होण्यापासून दूर रहा. संयमाने घरातील मंडळींशी वागा. घाईत कोणताच निर्णय घेऊ नका. मित्र परिवारासह वेळ घालवल्यास ताण कमी होईल.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा देऊ करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

मिथुन: मिथुन व्यक्तींचा आजचा दिवस हा आनंददायी जाईल. घरातील मंडळींचे सहकार्य तुमच्या कामासाठी उत्तम ठरेल. मित्र परिवारासह वेळ घालवा. नोकरीच्या ठिकाणी विचारपूर्वक वागा.

शुभ उपाय- गाईला चारा खाऊ घाला.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

कर्क: आज कर्क राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक कामे करा. आई-वडिलांची साथ लाभेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी कळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- कुत्र्याला चपाती खायला द्या.

शुभ दान- वृद्ध व्यक्तींना छानसे गिफ्ट द्या.

शुभ अंक- 4

शुभ रंग- पिवळा

सिंह: सिंह राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस खुप उत्साही असणार आहे. आई-वडिलांची साथ लाभणार आहे. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुश असेल.

शुभ उपाय- गायत्रीमंत्र वाचा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

कन्या: आज तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. घरातील मंडळींची साथ लाभेल. लग्नाची गोष्ट ठरेल. प्रिय व्यक्तीशी वाद घालण्याचे टाळा.

शुभ उपाय- शिवलिंगवर पाणी अर्पण करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- हिरवा

तुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी घरातील मंडळींशी भांडण करण्याचे टाळा. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीकडून कामाचे कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- अर्धा कप दुध प्या.

शुभ दान- कोणाचे उष्ट खाऊ नका.

शुभ अंक- 7

शुभ रंग- केशरी

वृश्चिक: आजच्या दिवशी वृश्चिक राशीतील व्यक्तींनी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची कामात मदत लाभेल. आई-वडिलांसोबत आदराने वागा.

शुभ उपाय- गणपती स्रोत्र वाचा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी विचारपूर्वक कामे करा. आई-वडिलांची साथ लाभेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी संयमाने वागा.

शुभ उपाय- देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

मकर: मकर राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल, थकीत पैसे दुसऱ्यांकडून मिळण्याची शक्यता आहे. मित्र परिवारासह वेळ घालवा.

शुभ उपाय- दही खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- गरजूंना वस्त्रदान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- करडा

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींनी आज प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. मित्र मैत्रिणीसह वेळ घालवा.

शुभ उपाय- केशरयुक्त दुधाचा नेवैद्य दाखवा.

शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- सोनेरी

मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींनी दुसऱ्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नका.तुमची कामे पूर्ण करा. आई-वडिलांचा आदर करा. प्रिय व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- कापूर आणि धूप घालून पूजा करा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा