Total Seats
BJP+ 352
Others 99
Congress+ 91
542 / 542

Sikkim Assembly Elections 2019

SeatsSKMSDFOthers
32
17
15
0

Andhra Pradesh Assembly Elections 2019

SeatsYSRCPTDPOthers
175
151
23
1

Odisha Assembly Elections 2019

SeatsBJDBJPOthers
147
112
23
11

राशीभविष्य 22 फेब्रुवारी: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे

राशीभविष्य 22 फेब्रुवारी: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे
राशी भविष्य-2019 (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

22 फेब्रुवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष: आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. वादविवाद होण्यापासून दूर रहा. संयमाने घरातील मंडळींशी वागा. घाईत कोणताच निर्णय घेऊ नका. मित्र परिवारासह वेळ घालवल्यास ताण कमी होईल.

 शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा देऊ करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजच्या दिवसात तुमच्याकडून एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने कामे पूर्ण होणार असून आत्मविश्वास वाढणार आहे. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- खडीसाखरेचे सेवन करावे.

शुभ दान- गरजूंना तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा

मिथुन: आज तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. घरातील मंडळींची साथ लाभेल. लग्नाची गोष्ट ठरेल. प्रिय व्यक्तीशी वाद घालण्याचे टाळा.

शुभ उपाय- शिवलिंगवर पाणी अर्पण करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- हिरवा

कर्क: या राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवशी व्यवसायात थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुने ताणतणाव कमी होतील. नवरा-बायकोमधील गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नकारात्मक असणार आहे.

शुभ उपाय- लाल रंगाचे वस्त्र देवाला अर्पण करा.

शुभ दान- अभ्यासू विद्यार्थ्यांना पुस्तक दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- करडा

सिंह: आज तुम्हाला ऑफिसातील किंवा इतर मंडळींच्या सहवासामुळे तुमच्यावरील ताण कमी होऊन त्यांची साथ लाभणार आहे. कोणत्यातरी जुन्या मित्र-मैत्रिणी सोबत गाठभेठ होऊ शकते. आजच्या दिवशी केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. परंतु तुम्ही जास्त भाऊक राहाल.

शुभ उपाय- अर्धा कप फिके दुध प्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. देवाचे नामस्मरण करा दिवस उत्तम जाईल.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

तुळ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

शुभ उपाय- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

वृश्चिक: वृश्चिक राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा मित्र मंडळीसह आनंदात वेळ घालवण्यात जाईल. तसेच संध्याकाळी काही पैशांची चणचण भासेल. आई-वडिलांचा कोणत्याही कामात सल्ला घ्या. तर प्रिय व्यक्तीकडून तुमच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- घरातील भिंतीवर लाल रंगाचा बल्ब लावा त्यामुळे घरातील सुख वाढेल.

शुभ दान- मजूरांना जलेबी खाऊ घाला

शुभ अंक- 2

शुभ रंग- क्रिम कलर

धनु: या राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजच्या दिवसात तुमच्याकडून एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने कामे पूर्ण होणार असून आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रपरिवारासह बाहेर जाण्याचा योग आहे. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- खडीसाखरेचे सेवन करावे.

शुभ दान- गरजूंना तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा

मकर: आजच्या दिवशी मकर राशीतील व्यक्तींना धनलाभ होणार आहे. परंतु आजारपणावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारधंद्यातील मंडळींचे थकीत पैसे परत मिळणार. मात्र कोणत्याही कामातील निर्णय घाईमध्ये घेणे टाळा.

शुभ उपाय- भगवान शंकराची उपासना करा.

शुभ दान- मंदीर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींनी घरातील मंडळींशी भांडण करण्याचे टाळा. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीकडून कामाचे कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- गायत्रीमंत्र वाचा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

मीन: या राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आनंदाची बातमी कळेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईंकांची गाठभेट होईल. पैशांच्या व्यवहारात सावधागिरी बाळगा. प्रिय व्यक्तींच्या भावनांचा आदर करा.

शुभ उपाय- घरात गोमूत्र शिंपडा.

शुभ दान- गरीबांना अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- केशरी

Lok Sabha Election Results 2019