The Kashmir Files चित्रपट पाहून घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर हल्ला, 3 जणांवर चाकूने करण्यात आले वार
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कुशीनगरमधील फाजिलनगर शहरात ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट पाहून सिनेमा हॉलमधून बाहेर पडणाऱ्या एका विशिष्ट समाजातील तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना तरुणांनी काही घोषणा दिल्या, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

फाजीलनगर पंचायत परिसरात असलेल्या सिनेमा हॉलमध्ये काश्मीर फाइल्स हा चित्रपट सुरू होता. शुक्रवारी शेवटच्या शोमध्ये विकास जोकवा बाजार येथील काही तरुण तो चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट पाहताना तरुण देशभक्तीपर घोषणा देत होते. ज्यामुळे एका विशिष्ट समाजातील तरुणांच्या भावना दुखावल्या. शोमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दरम्यान, एका बाजूच्या तरुणांनी दुसऱ्या बाजूच्या तरुणांवर हल्ला केला. (हेही वाचा - The Kashmir Files Box Office Collection: विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाने केला विक्रम, चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा केला पार)

या घटनेत अशोक जैस्वाल, छोटे लाल गोंड हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तिघांनाही सीएचसी फाजिलनगर येथे नेण्यात आले तेथून प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी तिघांनाही वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

यासंदर्भात पटहेरवाचे एसएचओ अखिलेश कुमार सिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी तरुणांवर उपचार सुरू असून कुटुंबियांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.