Kolkatta Crime: मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, 24 तासांत दुसरी घटना
Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Kolkatta Crime: कोलकत्ता येथे संतापजनक प्रकार घडला आहे. मोबाईल फोन चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणातील पीडित तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सॉल्ट लेक परिसरात घडली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, 24 तासांत अश्याच दोन घडना घडल्या आहे. (हेही वाचा- 58 वर्षीय बीएमसी कर्मचार्‍याविरूद्ध भ्रष्टाचार प्रकरणामध्ये 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसेन मंडल असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारहाण केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, मध्यरात्री पोलेनाईट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणी पुढील चौकशी सुरु केली आहे.

शुक्रवारी अशीच एक घटना कोलकाताच्या बोबझार या भागात घडली,मोबाईल फोन चोरीच्या संशयावरून विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतिगृहात काम करत असलेल्या व्यक्तीला मारहाण केली आहे. त्याला नंतर रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी या प्रकरणी 14 जणांना ताब्यात घेतले. इर्शाद आलम असं त्याचे नाव आहे. तो चांदणी चौकातील इलेक्ट्रॉनिक दुकानात मेकॅनिक म्हणून काम करायचा.