Jail Pixabay

Navi Mumbai: नवी मुंबईत पाण्याच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. त्याशिवाय, तिच्या 18 वर्षीय मुलीलादेखील शेजाऱ्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. पनवेलमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका शेजारी कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावा शेवा परिसरात पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार केल्याचा संशय घेऊन आरोपींनी आई-मुलीच्या दोघांवर हल्ला केला. (हेही वाचा:Mumbai Shocker: मुलुंडमध्ये 50 रुपयांचे आमिष दाखवून 13 वर्षीय मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार; आरोपी फरार )

दाखल एफआयआर नुसार, आरोपींनी महिलेला मारहाण केली. त्याशिवाय, किशोरवयीन मुलीला सार्वजनिकपणे विवस्त्र केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींनी हल्ल्यादरम्यान पीडितांना जातीयवादी अपशब्द वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलम 74 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 76 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि भारताच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय, न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कमलानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.