Sexually Abused | Representational Image (Photo credits: Pixabay)

Mumbai Shocker: मुंबई (Mumbai) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलुंड परिसरात (Mulund Area) पन्नास रुपयांचे आमिष दाखवून एका 13 वर्षीय मुलीवर अज्ञाताने लैंगिक अत्याचार (Sexually Assault) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जंगल परिसरात घडली असून वैद्यकीय तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (Case of Sexual Assault) दाखल केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार महिला, मुलुंड परिसरात आपल्या कुटुंबासह राहते आणि एका खाजगी केटरिंग कंपनीत काम करते. तिला 13 वर्षांची मुलगी आहे. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही मुलगी मुलुंड येथील पूर्व-पश्चिम पादचारी पूल ओलांडत असताना एका अज्ञात व्यक्तीला भेटली. या व्यक्तीने तिला पन्नास रुपये देण्याचे वचन दिले आणि तिला सोबत येण्यास सांगितले. आरोपीच्या आमिषाला बळी पडल्याने पीडित मुलगी त्या व्यक्तीच्या मागे गेली, जो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचारानंतर त्याने तिला घरी पाठवले आणि घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. (हेही वाचा -Vikhroli School Sexual Assault Case: विक्रोळी शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना; 11 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 51 वर्षीय शिक्षकावर गुन्हा दाखल)

त्यानंतर मुलीला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या, तिच्या आईने तिला सायन रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. विचारपूस केल्यावर, मुलीने तिच्या आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेची तक्रार मुलुंड पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा -Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना दिलासा; कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर)

दरम्यान, पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपांसह मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. ही घटना मे महिन्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आता फरार आरोपीला ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे.