Vikhroli School Sexual Assault Case: विक्रोळी पोलिसांनी (Vikhroli Police) शाळेच्या इमारतीत एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण (Sexual Assault Case) केल्याप्रकरणी 51 वर्षीय शाळेच्या शिक्षकाला अटक (Arrest) केली आहे. फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, गणेश दशरथ बाटा नावाच्या शाळेतील एका सदस्याने ही बाब उघडकीस आणली. भांडुप येथील रहिवासी असलेले बाटा शाळेच्या पहिल्या मजल्यावर फेऱ्या मारत असताना त्यांनी आरोपी सहायक शिक्षक हितेंद्र शेटे आणि साकी नाका येथील रहिवासी असलेली विद्यार्थीनीला संवाद साधताना पाहिले. घटनेच्या वेळी शेटे हे विद्यार्थिनिसोबत वर्गात होते.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात, बाटा यांनी नमूद केले की, ते शेटेच्या कृती थोड्या अंतरावरून पाहत होता. शेटे कथितरित्या वर्गाच्या दरवाजाकडे पाहत खोलीत कोणी जात आहे की नाही हे तपासत होते. त्या क्षणी, त्याने पीडितेच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि त्याच वेळी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तो वारंवार मुलीचा हात धरताना दिसत होता, असंही बाटा यांनी सांगितलं. (हेही वाचा -Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींना दिलासा; कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर)
शेटे यांच्या कृत्याने घाबरलेल्या बाटा यांनी ताबडतोब हस्तक्षेप केला आणि त्यांनी पीडित मुलीला शेटे यांच्यापासून दूर खेचले. त्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शेटे यांना अटक केली, पंचनामा केला आणि साक्षीदार व शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. त्यांनी मुलीचा जबाबही नोंदवला. (हेही वाचा - Wanowrie Sexual Assault Case: पुण्याच्या वानवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर बस ड्रायव्हर कडून लैंगिक अत्याचार)
दरम्यान, बाटा यांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून शेटे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 (महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कलम 8 (लैंगिक हल्ला) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.