Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur Sexual Assault Case) सहआरोपी असलेल्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जत येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी कल्याण न्यायालयाने (Kalyan Court) आज जामीन मंजूर केला. दोघांनाही आज एसआयटी (SIT) पथकाने जिल्हा न्यायालयात हजर केले. बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर तेथील परिचर अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता.
दरम्यान, गुरुवारी शाळेच्या दोन विश्वस्तांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, पोलिसांनी लगेचच दुसऱ्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेतले. उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. (हेही वाचा -Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू)
तथापी, आज कल्याण न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्याचे मत नोंदवले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. पी. मुळे यांनी 25 हजार रुपयांच्या जामीनावर विश्वस्तांना जामीन मंजूर केला. त्यानंतर, न्यायाधीशांनी राज्य-नियुक्त विशेष तपास पथकाला (एसआयटी) हल्ल्याच्या संदर्भात नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणात दोघांना अटक करण्याची परवानगी दिली. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा)
न्यायालयाच्या परवानगीनंतर, दोघांनाही उल्हासनगर गुन्हे शाखेने कर्जत येथून अटक केली. त्यानंतर त्यांना बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे सोपवण्यात आले.