बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर आता तसाच प्रकार पुण्यामध्येही वानवडी भागात (Wanowrie) होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्याच्या (Pune) एका शाळेतील मुलींना चालत्या स्कूल व्हॅन मध्ये त्रास दिल्याचं समोर आलं आहे. एका पीडीत मुलीने प्रायव्हेट पार्ट मध्ये जळजळ होत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर हा प्रकार प्रकाश झोकात आला आहे. त्यानंतर पालकांनी दुसर्या मुलीच्या पालकांनाही या प्रकाराची माहिती दिली.
वानवडी पोलिसांकडून मुलींवर बस मध्ये होत असलेल्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. यामध्ये बस चालकाने 6 वर्षीय मुलगी आणि तिच्या मैत्रिणीवर बस मध्ये त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 4 दिवस सुरू असल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
A shocking incident has occurred in the Wanowrie area of Pune, where a 45-year-old school bus driver has been accused of sexually assaulting two minor girls while the bus was in motion.
The police at the Wanowrie station have registered a case against the driver following the… pic.twitter.com/xvFLsQwwFK
— Pune Mirror (@ThePuneMirror) October 3, 2024
संतापलेल्या जमावाने फोडली व्हॅन
Wanowrie Physical Abuse Case: School Van Vandalized by Angry Mob!!#wanowrie #physicalabuse #schoolvan #schoolstudents #schoolvanvandalized #angrymob #latestnews #punemirror
(wanowrie physical abuse case, school van vandalized, angry mob, latest news, pune mirror) pic.twitter.com/S90IlZN37P
— Pune Mirror (@ThePuneMirror) October 3, 2024
बस चालक मुलींच्या जवळ बसून त्यांना त्रास होता. तसेच याबाबत धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान मुलींनी घरी गेल्यानंतर त्यांना त्रास होत असल्याची तक्रार केल्यावर आईने अधिक विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपी संजय जेटींग रेड्डी या स्कूल व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कुल व्हॅनची तोडफोड केली आहे.